जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रशिक्षणसामाजिक

लाखो वैष्णवांचा लोणी काळभोर–कदमवाकवस्तीत भक्तीचा महासागर ; संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे जल्लोषात स्वागत…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : ‘ज्ञानोबा… तुकाराम’, ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’च्या अखंड जयघोषात, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि विठ्ठलनामाच्या गजरात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा शनिवारी (ता. ११) सायंकाळी ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी लोणी काळभोर–कदमवाकवस्ती येथील पालखी तळावर अत्यंत भक्तिमय वातावरणात दाखल झाला. लाखो वारकरी, भाविक आणि पंचक्रोशीतील नागरिकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता. याची देही, याची डोळा हा अलौकिक सोहळा अनुभवण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ग्रामस्थ, विविध सामाजिक संस्था, सेवाभावी संघटना आणि मंडळांनी फुलांची उधळण करून संतांच्या पालखीचे उत्स्फूर्त स्वागत केले.

शनिवारी सकाळी पुण्यातील निवडुंग्या विठोबा मंदिरात पारंपरिक विधीवत पूजा झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना पालखी रथात विराजमान करण्यात आले. त्यानंतर पालखी सोहळ्याने पुलगेट, हडपसर आणि गाडीतळ मार्गे पुणे-सोलापूर महामार्गाने पुढे प्रस्थान केले. गाडीतळ येथे अल्प विश्रांतीनंतर शेवाळेवाडी ग्रामस्थांनी पालखीचे उत्साहात स्वागत केले. त्यानंतर मांजरी बुद्रुक येथे दुपारचा विसावा घेण्यात आला. पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर नवचैतन्याने भारावलेले वारकरी, टाळकरी आणि फडकरी विठ्ठलनामाचा अखंड गजर करत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत होते. भगवे पताके, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण महामार्ग भक्तीरसाने ओथंबून गेला होता.

दुपारचा विसावा संपल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पालखी सोहळा कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्यावर दाखल झाला. यावेळी हजारो भाविकांनी टाळ्यांचा कडकडाट, फुलांची उधळण आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’च्या जयघोषात संतांच्या पालखीचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, जिल्हा परिषद सदस्या शीतल कांबळे, पंचायत समिती सदस्य अमोल टेकाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, उपसरपंच नासीर पठाण, ग्रामपंचायत सदस्य अविनाश बडदे, हभप सुशील महाराज काळभोर, अँड राहुल झेंडे, अँड बाळासाहेब दाभाडे, ग्रामसेवक अमोल घोळवे, श्रीकांत वाव्हळ, माजी उपसरपंच देविदास कदम, सामाजिक कार्यकर्ते विशाल गुजर, गौरव काळभोर, शाहिर महेश खुळपे, अतुल कदम, नितीन टिळेकर, राकेश लोंढे, समीर शेडगे, यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

कवडीपाट येथून पुढे निघालेला पालखी सोहळा सायंकाळी सहाच्या सुमारास लोणी स्टेशन चौकात पोहोचताच फटाक्यांच्या आतषबाजीने आणि विठ्ठलनामाच्या गजरात त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. लोणी काळभोर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष सचिन काळभोर, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष आबासाहेब कांचन, माजी सरपंच योगेश काळभोर यांनी संतांच्या पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले. त्यानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास पालखी कदमवाकवस्ती येथील पालखी तळावर मुक्कामी दाखल झाली. सार्वजनिक आरतीनंतर विठ्ठलनामाच्या अखंड गजरात ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामाची सांगता झाली.

पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी ग्रामपंचायत कदमवाकवस्ती, पंचायत समिती हवेली, समस्त कवडीपाट माळवाडी मित्र मंडळ, छत्रपती ग्रुप, यांच्यासह अनेक संस्था आणि मंडळांनी फराळाचे वाटप केले.

आरोग्य विभागाच्या वतीने वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी औषध उपलब्ध करण्यात आली. आवश्यक औषधांचेही समर्पन ओल्ड एज मार्फत मोफत वितरण करण्यात आले.

योगिनी एकादशीच्या निमित्ताने अंबरनाथ देवस्थान ट्रस्ट, अंबरनाथ लोकसेवा प्रतिष्ठान, विश्वरत्न फाउंडेशन, तसेच मित्र मंडळ, संस्था, ट्रस्ट, संघटना, प्रतिष्ठान, तसेच छोटे व्यवसाईक, मुस्लिम आणि शीख समाजबांधवांनी वारकऱ्यांसाठी चहा, खिचडी, चिवडा, केळी आणि इतर उपवासाच्या पदार्थांचे मोठ्या प्रमाणात वाटप करून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले.

रात्रभर पालखी तळावर आणि परिसरात भजन, कीर्तन, प्रवचन, जागर आणि हरीनाम सप्ताह सुरू होता. त्यामुळे संपूर्ण लोणी काळभोर–कदमवाकवस्ती परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला. पालखी तळावर संतांच्या पालखीचा मुक्काम असला तरी सोहळ्यातील अनेक दिंड्यांनी गावातील मंदिरे, शाळा, महाविद्यालये आणि पारंपरिक मुक्कामस्थळी मुक्काम केला.

 

संपूर्ण पालखी सोहळा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा यासाठी पुणे शहरच्या वतीने अतिरिक्त बंदोबस्ता बरोबर लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. वाहतूक नियोजन, सुरक्षा व्यवस्था आणि भाविकांच्या सुविधांवर विशेष लक्ष देण्यात आल्याने लाखो वारकऱ्यांचा हा ऐतिहासिक मुक्काम निर्विघ्न आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??