आरोग्यजिल्हादेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशिक्षणसामाजिक

देशातील शाळांमध्ये ‘सर्वसमावेशक लैंगिक शिक्षण’ सक्तीचे होणार; अभ्यासक्रमात नव्या विषयाचा समावेश, तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती

सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारची माहिती; प्राथमिक स्तरापासून 'सेफ-अनसेफ टच', शारीरिक सुरक्षा आणि किशोरवयीन बदलांबाबत मार्गदर्शन...

नवी दिल्ली : देशातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘सर्वसमावेशक लैंगिक शिक्षण’ (Comprehensive Sexuality Education) हा विषय लवकरच अभ्यासक्रमाचा अनिवार्य भाग होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात तज्ज्ञ समितीच्या शिफारशी स्वीकारल्याची माहिती दिली. न्यायालयाच्या अंतिम मंजुरीनंतर हा विषय देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये टप्प्याटप्प्याने लागू केला जाणार आहे.

न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. अल्पवयीन मुलांमधील गर्भधारणा, पौगंडावस्थेतील संबंध आणि त्यातून वाढणाऱ्या पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार केंद्र सरकारने २६ सदस्यीय राष्ट्रीय तज्ज्ञ समितीची स्थापना केली होती.

महिला व बालविकास मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या समितीत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मानसोपचारतज्ज्ञ, विविध केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (NCPCR) आणि नालसा (NALSA) यांसह विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा समावेश होता.

समितीने प्राथमिक स्तरापासून विद्यार्थ्यांना शारीरिक सुरक्षा, शरीराचे अवयव, वैयक्तिक स्वच्छता, ‘सेफ टच’ आणि ‘अनसेफ टच’ यांसारख्या मूलभूत संकल्पनांची माहिती देण्याची शिफारस केली आहे. विद्यार्थ्यांच्या वयानुसार शारीरिक व मानसिक बदल, आरोग्यदायी नातेसंबंध, जीवनकौशल्ये आणि लैंगिक शोषणापासून संरक्षण याविषयीही मार्गदर्शन केले जाणार आहे.

हा संपूर्ण उपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या चौकटीत राबवला जाणार असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, तार्किक विचार आणि जीवनकौशल्ये विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.

समितीच्या प्रमुख शिफारशी :

👉🏻प्राथमिक शाळेपासूनच विषय शिकविण्यासाठी विशेष प्रशिक्षित तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती.
👉🏻आठवड्यातून किमान दोन वेळा १५ ते २० मिनिटांचे वर्ग अनिवार्य.
पालक, शिक्षक आणि
👉🏻पालक-प्रतिनिधींसाठी जनजागृती व मार्गदर्शन बैठका.
👉🏻विद्यार्थ्यांच्या वयानुसार शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदलांविषयी वैज्ञानिक माहिती.
👉🏻बाल लैंगिक शोषण प्रतिबंध आणि वैयक्तिक सुरक्षेवर विशेष भर.

या विषयाबाबत सामाजिक गैरसमज दूर करण्यास आणि विद्यार्थ्यांना वैज्ञानिक, वयाला अनुरूप व सुरक्षिततेशी संबंधित शिक्षण देण्यास या निर्णयामुळे मोठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. न्यायालयाच्या अंतिम आदेशानंतर या शिफारशींच्या अंमलबजावणीला गती मिळण्याची शक्यता आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??