
शेवाळेवाडी (पुणे) : संतश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानंतर पालखी मार्ग स्वच्छ, सुंदर आणि दुर्गंधीमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने राजे क्लबचे अध्यक्ष अमित अण्णा पवार यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सलग पाचव्या वर्षी हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
पालखी सोहळ्यानंतर लाखो वारकऱ्यांच्या व भाविकांच्या वर्दळीमुळे पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा साचतो. हा परिसर तातडीने स्वच्छ करून नागरिकांसाठी आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने राजे क्लबने ही मोहीम हाती घेतली. या अभियानात क्लबचे तब्बल ७० हून अधिक स्वयंसेवपालखी सोहळ्यानंतर लाखो वारकऱ्यांच्या व भाविकांच्या वर्दळीमुळे पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा साचतो. हा परिसर तातडीने स्वच्छ करून नागरिकांसाठी आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने राजे क्लबने ही मोहीम हाती घेतली. या अभियानात क्लबचे तब्बल ७० हून अधिक स्वयंसेवक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
स्वयंसेवकांनी शेवाळेवाडी फाटा ते द्रुतगती महामार्ग परिसरात स्वच्छता मोहीम राबवत प्लास्टिक, कागद, पाण्याच्या बाटल्या, थर्माकोल तसेच इतर टाकाऊ वस्तू गोळा करून परिसर कचरामुक्त केला. काही तासांच्या अथक परिश्रमानंतर संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमामुळे पालखी मार्गाचे स्वच्छ आणि सुशोभित रूप पुन्हा एकदा पाहायला मिळाले.
यावेळी राजे क्लबचे अध्यक्ष अमित अण्णा पवार यांनी सांगितले की, “स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. पालखी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि श्रद्धेचा उत्सव आहे. त्यामुळे पालखी मार्ग स्वच्छ ठेवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्व जपत प्रत्येकाने अशा उपक्रमात सहभागी व्हावे.”
राजे क्लबने गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने पालखी मार्गावर महास्वच्छता अभियान राबवत सामाजिक सेवेचा आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमाचे नागरिक, वारकरी आणि स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून, भविष्यातही समाजहिताचे विविध उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्धार क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
Editer sunil thorat



