जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

इनरव्हील क्लब ऑफ पुणे इम्पेरियलच्या अध्यक्षपदी प्रीती परदेशी; ‘फिट गर्ल फिट इंडिया’ आणि ‘एक महिला, एक वृक्ष’ अभियानाची घोषणा…

पुणे : (दि.१८) सेवाभावी उपक्रमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या इनरव्हील क्लब ऑफ पुणे इम्पेरियलच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी श्रीमती प्रीती परदेशी यांनी क्लबच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारत आपल्या कार्यकाळात मुलींचे सशक्तीकरण, आरोग्य जनजागृती आणि पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देणार असल्याची घोषणा केली.

पदग्रहणानंतर बोलताना प्रीती परदेशी म्हणाल्या, “‘फिट गर्ल फिट इंडिया’ हे आमच्या कार्यकाळाचे ब्रीदवाक्य असेल. मुली हे देशाचे भविष्य असून त्यांचे सबलीकरण, सशक्तीकरण आणि स्वावलंबनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील. तसेच ‘एक महिला, एक वृक्ष’ या अभियानातून प्रत्येक सदस्याने पर्यावरण संवर्धनासाठी योगदान द्यावे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाग्यश्री शास्त्री यांनी केले. प्रमुख पाहुण्या म्हणून डिस्ट्रिक्ट चेअरमन दीपशिखा पाठक उपस्थित होत्या. त्यांनी इनरव्हील क्लबच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.

यावेळी क्लबच्या सचिव जिनाली पटेल, कोषाध्यक्ष प्राजक्ता येवले, आयएसओ योगिनी पेंडसे, एडिटर सविता जुंदाळे तसेच ज्येष्ठ सदस्य अलका राजवाडे, वीणा रामन, प्रिया ढेरे आणि करुणा परदेशी यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुधा भट यांनी केले. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून समाजोपयोगी, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??