जिल्हासामाजिक

अश्लील डीजे लावणीवर राज्य शासनाचा चाप; लावणी-तमाशासाठी स्वतंत्र नियमावली, भरारी पथके स्थापन होणार…

सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सेन्सॉर बोर्डाची पूर्वपरवानगी अनिवार्य करण्याचा निर्णय; लोककला संवर्धनासाठी महत्त्वाचे प्रस्ताव चर्चेत...

मुंबई, दि. २४ : महाराष्ट्रातील लोककला, लावणी-तमाशा आणि चित्रपट क्षेत्राचे जतन व संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाची पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभर वाढत चाललेल्या अश्लील डीजे लावणी कार्यक्रमांना आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष भरारी पथके स्थापन करण्यात येणार असून, लावणी-तमाशा आणि संबंधित सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र नियमावली तयार केली जाणार आहे. तसेच अशा कार्यक्रमांसाठी सेन्सॉर बोर्डाची पूर्वपरवानगी अनिवार्य करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने सांस्कृतिक कार्य विभागाचे मुख्य सचिव किरण कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. बैठकीला प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, रेश्मा परितेकर, मोहित नारायणगावकर, नारायण जवळेकर, नितीन धावणे पाटील तसेच अभिनेत्री अपेक्षा चव्हाण उपस्थित होत्या.

बैठकीत पारंपरिक लावणी, तमाशा आणि लोककलेचे जतन करताना अश्लीलतेला आळा घालण्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी लोककलावंत, तमाशा मंडळे आणि संबंधित संघटनांकडून सूचना व अटी मागविण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सेन्सॉर बोर्डामार्फत आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात येणार असून, संगीत बारी आणि कला केंद्रांमध्ये होणाऱ्या अश्लील डीजे नृत्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हानिहाय भरारी पथके कार्यरत राहणार आहेत.

याशिवाय बैठकीत लुप्त होत चाललेल्या टुरिंग टॉकीजना आर्थिक अनुदान व पुनरुज्जीवन योजना, बंद पडत असलेल्या सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांसाठी विशेष आर्थिक पॅकेज व करसवलती, लोकशाहीर विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मारकाची उभारणी आणि त्यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव, तसेच दादासाहेब फाळके स्मारकाच्या विकासाबाबतही सकारात्मक चर्चा झाली.

चित्रपट, मालिका आणि वेब सिरीजच्या चित्रीकरणावेळी कलाकार व तंत्रज्ञांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र तपासणी यंत्रणा उभारणे, तसेच महाराष्ट्राला चित्रपट चित्रीकरणासाठी अधिक आकर्षक केंद्र बनविण्यासाठी परवानगी प्रक्रिया सुलभ करणे आणि स्थानिक कलाकारांना अधिक संधी देण्याबाबतही बैठकीत सकारात्मक विचारविनिमय झाला.

बैठकीतील प्रमुख निर्णय…

👉🏻प्रत्येक जिल्ह्यात अश्लील डीजे लावणी रोखण्यासाठी विशेष भरारी पथके.
👉🏻लावणी-तमाशासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार.
👉🏻सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सेन्सॉर बोर्डाची पूर्वपरवानगी अनिवार्य.
👉🏻टुरिंग टॉकीज व सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांसाठी विशेष पुनरुज्जीवन योजना.
👉🏻लोकशाहीर विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळाची संकल्पना.
👉🏻चित्रपट चित्रीकरणासाठी परवानगी प्रक्रिया अधिक सुलभ करून स्थानिक कलाकारांना प्राधान्य देण्याचा निर्णय.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??