जिल्हादेश विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

पार्थ पवार यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरला; २९ जुलैला साखरपुडा, २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामतीत विवाह…

पुणे, दि. २४ : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांच्या विवाहाची तारीख निश्चित झाली असून, पवार कुटुंबात पुन्हा एकदा सनई-चौघडे वाजणार आहेत. २९ जुलै २०२६ रोजी पुण्यात अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात त्यांचा साखरपुडा होणार असून, २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे विवाहसोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पार्थ पवार यांच्या होणाऱ्या पत्नीबाबत विविध माध्यमांमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, त्यांच्या कार्यालयाकडून अधिकृत माहिती देत त्यांचे नाव कायनात दारा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्या मूळच्या चंदीगड येथील पंजाबी कुटुंबातील असून सध्या दिल्ली येथे वास्तव्यास आहेत. त्या काश्मिरी असल्याच्या चर्चांना यामुळे पूर्णविराम मिळाला आहे.

कायनात दारा यांनी दिल्लीतील प्रतिष्ठित द ब्रिटिश स्कूल, चाणक्यपुरी येथून शालेय शिक्षण पूर्ण केले असून, त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) मधून उच्च शिक्षण घेतले आहे. त्यांनी काही काळ NDTV मध्ये आउटपुट एडिटर आणि रिपोर्टर म्हणून काम केले. सध्या त्या आपल्या कुटुंबाच्या हॉस्पिटॅलिटी आणि रिअल इस्टेट व्यवसायाची जबाबदारी सांभाळत आहेत.

पार्थ पवार आणि कायनात दारा यांची अनेक वर्षांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली आणि अखेर दोघांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाहसोहळ्यातही कायनात दारा यांनी पवार कुटुंबासोबत उपस्थिती लावली होती. त्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा अधिक रंगली होती.

दरम्यान, पार्थ पवार यांच्या विवाहासंदर्भातील धार्मिक परंपरा आणि शंकांचे निरसन करण्यासाठी करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतरच विवाहाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला.

२९ जुलै रोजी पुण्यात मोजक्या नातेवाईक आणि निमंत्रितांच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडणार असून, २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे विवाहसोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??