यांनी उपोषण सोडलं, पण अभिजीत दिपकेंचा मोठा निर्णय; आंदोलन सुरूच राहणार…

नवी दिल्ली : NEET पेपर लीक प्रकरणावर देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. तब्बल 26 दिवसांपासून आमरण उपोषण करत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर आपले उपोषण मागे घेतले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणावर प्रथमच देशाला उद्देशून प्रतिक्रिया दिली.
मात्र, उपोषण संपले असले तरी आंदोलन थांबणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. Cockroach Janta Party (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे जंतर-मंतरवरील शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा केली.
दिपके यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “सोनम वांगचूक यांनी 26 दिवसांचे उपोषण संपवल्याचा आम्हाला दिलासा आहे. त्यांच्या धैर्याने आणि त्यागामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधले गेले. त्यांचे आयुष्य देशासाठी अत्यंत मौल्यवान आहे.” त्याचबरोबर त्यांनी स्पष्ट केले की, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण होईपर्यंत CJP चे आंदोलन सुरू राहील.
CJP ने पुन्हा एकदा NEET पेपर लीक प्रकरणात नैतिक व राजकीय जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
सोनम वांगचूक यांचे उपोषण मागे घेणे, पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया आणि अभिजीत दिपके यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा घेतलेला निर्णय यामुळे NEET पेपर लीक प्रकरण पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. आता केंद्र सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
Editer sunil thorat



