क्राईम न्युज

सायबर फसवणुकीतील २.८६ लाखांची रक्कम हस्तगत ; लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाची उल्लेखनीय कामगिरी…

लोणी काळभोर (ता. हवेली) : सायबर चोरट्यांकडून ऑनलाईन फसवणूक झालेली तब्बल २ लाख ८६ हजार ६८ रुपये यशस्वीरीत्या परत मिळवण्यात लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या सायबर पथकास मोठे यश मिळाले आहे.

नोव्हेंबर २०२५ मध्ये तक्रारदार महादेव महारुद्र कचरे (वय ५७, रा. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) यांनी जुना अशोक लेलँड टेम्पो खरेदी केला होता. या व्यवहारासाठी त्यांनी मन्नपुरम फायनान्स लिमिटेडकडून कर्ज घेतले होते. कर्जाच्या परतफेडीबाबत अज्ञात इसमाने ऑनलाईन संपर्क साधत कर्जाच्या रकमेवर काही टक्के सवलत देण्याचे आमिष दाखवून तक्रारदाराचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातील २,८६,०६८ रुपये अन्य बँक खात्यावर वर्ग करून सायबर फसवणूक करण्यात आली.

तक्रारदारांनी कर्जाची रक्कम जमा झाल्याची खात्री करण्यासाठी मन्नपुरम फायनान्स कार्यालयात चौकशी केली असता सदर रक्कम कर्ज खात्यावर जमा न झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी आपली सायबर फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी सायबर पथकाला तात्काळ तपासाचे आदेश दिले. आदेशानुसार सायबर पथकाने तांत्रिक विश्लेषण व ई-मेलद्वारे प्रभावी पाठपुरावा करत अल्पावधीत फसवणूक झालेली संपूर्ण रक्कम हस्तगत करून तक्रारदारास परत मिळवून दिली.

रक्कम परत मिळाल्याने तक्रारदारांनी लोणीकाळभोर पोलीस ठाणे व सायबर पथकाच्या कार्याचे मनापासून कौतुक करत आभार व्यक्त केले.

ही उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०६ डॉ. राजकुमार शिंदे व सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणीकाळभोर विभाग श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पो.हवा. देवीकर, पो.अंमलदार बाजीराव वीर व उषा थोरात यांनी सहभाग घेतला.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??