जिल्हामहाराष्ट्रशिक्षणसामाजिक

नवागत विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना ‘फार्मा आरंभ’मधून नवी दिशा; जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये फ्रेशर्स पार्टी उत्साहात

‘नवपर्व – नव्या स्वप्नांचा नवा आरंभ’ संकल्पनेतून नव्या शैक्षणिक प्रवासाचे स्वागत; सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली

पुणे : जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, हडपसर येथे नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेली ‘फार्मा आरंभ – नवपर्व : नव्या स्वप्नांचा नवा आरंभ’ ही फ्रेशर्स पार्टी २०२६ उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाली.

महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाची ओळख करून देणे, त्यांच्यामध्ये मैत्री, आपुलकी आणि एकजुटीची भावना निर्माण करणे तसेच त्यांच्या नव्या शैक्षणिक प्रवासाची आनंददायी सुरुवात करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, मनोरंजक खेळ आणि विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. नवागत विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. संपूर्ण कार्यक्रमात उत्साह, आनंद आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर पाटील यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त, आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन आणि ध्येय निश्चितीचे महत्त्व पटवून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करताना सामाजिक बांधिलकी आणि व्यावसायिक मूल्येही जपावीत, असा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलोनी, संचिता, चैतन्य, साक्षी, दुर्गा आणि मानसी या विद्यार्थ्यांनी केले. यावेळी संकुल संचालक डॉ. वसंत बुगडे आणि डॉ. मारुती काळबांडे उपस्थित होते.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. प्रगती लगदिवे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच डॉ. रविराज जाधव, डॉ. अजय साळुंके, प्रा. अनुराधा पाटील, प्रा. निकिता कोलते, प्रा. चेतन मामडगे, प्रा. शितल हुमनाबादे, स्वप्नाली सावंत, ऋतुजा दाते, विवेक थोरात, स्वाती माकोने, रुपाली शिंदे, पांडुरंग पवार, वर्षा सुतार आणि आरती धुमाळे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सहकार्य केले.

‘फार्मा आरंभ’ या उपक्रमातून नवागत विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाची नवी ओळख, मैत्रीचे नवे बंध आणि उज्ज्वल भविष्याची प्रेरणा मिळाली. ‘नवपर्व – नव्या स्वप्नांचा नवा आरंभ’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकारत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील नव्या पर्वाची आनंदमय सुरुवात या कार्यक्रमाने झाली.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

वेध जनशक्तीचा शक्ती जनतेची, वेध सत्याचा! सूचना, अस्वीकरण व संपादकीय धोरण “वेध जनशक्तीचा” हे पुणे येथून कार्यरत असलेले स्वतंत्र वेब न्यूज पोर्टल असून, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय, गुन्हेगारी तसेच विविध जनहिताच्या विषयांवरील बातम्या आणि माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे हा आमचा उद्देश आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, वृत्त, निवेदने, छायाचित्रे, व्हिडिओ किंवा अन्य सामग्री ही उपलब्ध कागदपत्रे, अधिकृत माहिती, प्रत्यक्षदर्शी, संबंधित व्यक्ती, प्रतिनिधी, वार्ताहर तसेच विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार प्रकाशित केली जाऊ शकते. बातमी प्रसिद्ध करण्याचा अधिकार जनहिताच्या दृष्टीने आवश्यक, महत्त्वाची किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित माहिती प्रसिद्ध करण्याचा संपादकीय निर्णयाचा अधिकार “वेध जनशक्तीचा” राखून ठेवते. कोणत्याही व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणा, व्यावसायिक संस्था अथवा इतर घटकाविषयी बातमी प्रसिद्ध झाल्याने त्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध पूर्वग्रह किंवा वैयक्तिक वैर असल्याचे समजले जाऊ नये. बातमीमध्ये एखाद्या व्यक्तीवर आरोप, तक्रार, गुन्हा, चौकशी, कारवाई किंवा अन्य गंभीर बाब नमूद असल्यास, उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारे ती बाब वाचकांसमोर मांडण्याचा पत्रकारितेचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आरोप प्रसिद्ध होणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरल्याचे मानले जाणार नाही. अंतिम सत्यता ठरविण्याचा अधिकार संबंधित सक्षम न्यायालय अथवा कायदेशीर प्राधिकरणास आहे. खोटी माहिती, दबाव व धमक्यांना थारा नाही “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाच्या दबावाखाली येऊन जनहिताच्या बातम्या मागे घेणे, बदलणे किंवा प्रसिद्ध न करणे यास बांधील राहणार नाही. तसेच, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर धमकी, दबाव, राजकीय हस्तक्षेप, वैयक्तिक आरोप, सोशल मीडिया दबाव किंवा अन्य कोणत्याही अनुचित मार्गाने संपादकीय निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न स्वीकारला जाणार नाही. मात्र, बातमीमध्ये वस्तुनिष्ठ तथ्यात्मक चूक असल्याचे विश्वसनीय पुराव्यांसह निदर्शनास आणून दिल्यास त्याची निष्पक्षपणे पडताळणी केली जाईल. दुरुस्ती, खुलासा व हरकत एखाद्या बातमीतील माहिती चुकीची, अपूर्ण किंवा वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचा दावा असल्यास संबंधित व्यक्ती अथवा संस्थेने केवळ तोंडी आक्षेप नोंदविण्याऐवजी— 👉संबंधित बातमीची लिंक, 👉चुकीची माहिती नेमकी कोणती आहे याचा स्पष्ट उल्लेख, 👉अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय पुरावे, 👉स्वतःची अधिकृत बाजू/खुलासा, 👉आवश्यक असल्यास संपर्काची माहिती आमच्याकडे उपलब्ध करून द्यावी. प्राप्त कागदपत्रे व माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आल्यास संबंधित बातमीमध्ये आवश्यक दुरुस्ती, स्पष्टीकरण, अद्ययावत माहिती किंवा अन्य योग्य संपादकीय कार्यवाही करण्यात येईल. केवळ बातमी आवडली नाही, प्रतिष्ठेला धक्का बसला, टीका झाली किंवा बातमी हटविण्याची मागणी करण्यात आली म्हणून बातमी आपोआप हटविली जाणार नाही. वार्ताहर व प्रतिनिधींबाबत महत्त्वाची सूचना “वेध जनशक्तीचा”शी संबंधित सर्व वार्ताहर, प्रतिनिधी व अन्य व्यक्तींनी आपल्या अधिकाराच्या मर्यादेतच काम करावे. कोणत्याही व्यक्तीकडून पैशांची मागणी, खंडणीसदृश व्यवहार, वैयक्तिक लाभाची मागणी, धमकी, दबाव, ब्लॅकमेलिंग किंवा पोर्टलच्या नावाचा गैरवापर झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची वैयक्तिक राहील. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध उपलब्ध कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. स्रोत व गोपनीयता पत्रकारितेच्या कामकाजात प्राप्त होणाऱ्या काही माहितीचे स्रोत गोपनीय ठेवण्याची आवश्यकता असू शकते. अशा वेळी कायदा व पत्रकारितेच्या मान्य तत्त्वांच्या अधीन राहून स्रोताची माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार संपादकीय विभाग राखून ठेवतो. तृतीय-पक्षाची सामग्री वाचकांच्या प्रतिक्रिया, निवेदने, जाहिराती, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, छायाचित्रे किंवा अन्य तृतीय-पक्षाची सामग्री प्रसिद्ध झाल्यास त्यातील प्रत्येक विधान हे पोर्टलचे अधिकृत मत असेलच असे नाही. अशा सामग्रीची जबाबदारी संबंधित सामग्री पुरविणाऱ्या व्यक्ती/संस्थेची राहू शकते. ⚠️ अंतिम महत्त्वाची नोंद “वेध जनशक्तीचा” हे सत्य, तथ्याधारित, जबाबदार आणि जनहिताची पत्रकारिता करण्यास कटिबद्ध आहे. अनावधानाने किंवा उपलब्ध माहितीच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या सामग्रीमध्ये तथ्यात्मक त्रुटी आढळल्यास योग्य पुराव्यांच्या आधारे त्याची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. मात्र, बातमीतील तथ्यात्मक चूक आणि बातमीमुळे निर्माण झालेली नाराजी या दोन वेगळ्या बाबी आहेत. तथ्यात्मक चूक सिद्ध झाल्यास दुरुस्ती केली जाईल; परंतु केवळ बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे निर्माण झालेला दबाव, नाराजी किंवा विरोध हा बातमी मागे घेण्याचा स्वयंचलित आधार मानला जाणार नाही. “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्तीची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने पत्रकारिता करत नाही; त्याचप्रमाणे जनहिताशी संबंधित सत्य, अधिकृत आणि पडताळणीयोग्य माहिती केवळ कोणाला अप्रिय वाटते म्हणून दडपण्याचेही धोरण नाही. सर्व कायदेशीर बाबींमध्ये लागू असलेले भारतीय कायदे व सक्षम न्यायालय/प्राधिकरणाचे आदेश अंतिम व बंधनकारक राहतील. न्यायक्षेत्र (Jurisdiction) या पोर्टलशी संबंधित कोणताही वाद, तक्रार किंवा कायदेशीर कार्यवाही उद्भवल्यास, लागू कायद्याच्या अधीन राहून बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथील सक्षम न्यायालयांना न्यायक्षेत्र राहील. संपर्क मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात 📞 7249314996 संपादक : श्री अमोल रजपूत 8169324814 कार्यकारी संपादक : सहकार्यकारी संपादक : उपकार्यकारी संपादक : जिल्हा संपादक : जिल्हा उपसंपादक : विकास तिखे कायदेशीर सल्लागार : अँड. आनंद थोरात वेब पोर्टल : www.vedhjanshakticha.in “शक्ती जनतेची, वेध सत्याचा!” — वेध जनशक्तीचा संपादकीय विभाग बातमी अधिक ठाम आणि दबावाला उत्तर देणारी आहे, विशेषतः “बातमी आवडली नाही म्हणून हटविली जाणार नाही” आणि वार्ताहरांकडून पोर्टलच्या नावाचा गैरवापर केला जाणार नाही या बाबतीत. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??