राजकीय

आता गावकी भावकीची भांडण संपणार : केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ.

पुणे : स्‍वामित्‍व योजनेमुळे लाखो कुटुंब गावातील गावठाणाच्या जागेचे मालक झाले आहेत. त्‍यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. तसेच, या योजनेमुळे गावकी भावकीची भांडण मिटणार आहेत आणि बहीण-भाऊ यांच्‍यातील वाद देखील होणार नाहीत, असे मत केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज येथे केले.

       पुण्यातील नागरिकांना स्वामित्व योजने अंतर्गत मोहोळ यांच्या हस्ते मालमत्ता सनद वाटप जिल्हा परिषदेत झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर जमाबंदी आयुक्त आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, उपसंचालक भूमी अभिलेख राजेंद्र गोळे आदी उपस्थित होते.

      मुरलीधर मोहोळ म्हणाले की, या योजनेमुळे राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज उपलब्ध होऊन ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान सुधारण्यासही मदत होणार आहे. शहरातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असल्याने इंग्रजांनी ग्रामीण भागाकडे जास्त लक्ष दिले नाही. यामुळे गावठाणातील जमिनीचे भूमापन कधीच झाले नव्हते. यामुळे मागच्या काही वर्षांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. आता, स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ड्रोनच्या मदतीने गावांचे सर्व्हे करण्यात आले आहे. बँकेचे कर्ज मिळत नव्हते. घरात, भावकीत वाद होत होते. स्वामित्व योजनेंतर्गत देण्यात आलेल्या मालमत्ता सनदीमुळे अनेक गोष्टी सुकर होणार असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??