जिल्हासामाजिक

पहिली नैतिक शिक्षण परिषद संपन्न.. ; मांजरी बुद्रुक.

पुणे (हडपसर) : मांजरी बुद्रुक येथील समाज विकास संस्थेच्या वतीने जाई मंगल कार्यालयात राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून नैतिक शिक्षण परीषदेचे आयोजन करण्यात आले.

      या परिषदेला उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त आय ए एस अधिकारी अविनाश धर्माधिकारी तर अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस हे उपस्थित होते. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.

       अविनाश धर्माधिकारी आपल्या भाषणात म्हणाले की, प्रशासनात विविध पदे मिळतात आणि पदे जातात ही मिळणारी पदे ही आळवावरच्या पाण्यासारखी असतात मात्र त्या पदावर राहून आपण काम काय केलं याला महत्त्व राहते. पदावर राहून दुःखितांचे अश्रू पुसले का अनैतिक बाबींना दूर ठेवले का आपल्या पदाचा नैतिकतेने वापर करून सर्वसामान्य माणसांचं हित जोपासलं का ज्या पदावर आपण राहिलो त्या पदाला न्याय दिला का आणि जर तो न्याय दिला तरच ते शाश्वत आहे. आज समाजाला खऱ्या अर्थाने नैतिक शिक्षणाची गरज आहे. निर्व्यसनी समाज निर्माण होणे विशेषता युवा पिढी आज व्यसनाच्या आहारी जात आहे व्यसनच करायचे आहेत तर चांगली व्यसन करा अभ्यासाचे व्यसन करा, व्यायामाचे व्यसन करा, प्रामाणिकपणाच व्यसन करा, निस्वार्थ समाजसेवेचे व्यसन करा अशी व्यसन करा ज्यामुळे आपल्या देशाची मान उंचावेल. नैतिक शिक्षणावर भाष्य करीत असताना महाराष्ट्र आणि भारताच्या शैक्षणिक धोरणावर बोलावं लागेल मात्र सर्व काही सरकारवर अवलंबून राहण्यापेक्षा घर, कुटुंब, शाळा, कॉलेज, समाज या सर्व स्तरांवर नैतिक शिक्षणाचे नीतिमूल्य रुजायला हवेत आणि याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करायला हवी. आई वडील जसे वागतात तसेच मुलंही वागण्याचा प्रयत्न करीत असतात नैतिक शिक्षण ही आज काळाची गरज बनली आहे त्यामुळे आज सर्वच स्तरांवरून या बाबींचा विचार होणं आवश्यक आहे.

       त्यानंतर डॉ श्रीपाल सबनीस आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की संत ज्ञानेश्वरांच्या आळंदीत लहान बालकांचे लैंगिक शोषण करण्यात आलं. इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी आपल्याच वर्गातील मुलासोबत भांडण झाले म्हणून, बाथरूमच्या खिडकीचा काच काढून भर वर्गात दुसऱ्या विद्यार्थ्यांचा गळा चिरतो. पुणे शहरासारख्या ठिकाणी भर रस्त्यात एका महिलेला मारले गेलं, अनेक जण शेजारी उभे राहून बघतात टीव्हीवर एक दोन तीन असा घटनाक्रम दाखवला जातो, शेजारी उभे असणारे काहीही करत नाहीत केवळ बघ्याची भूमिका घेतात. मुलाला मोबाईल फोन घेऊन दिला नाही म्हणून मुलगा आईचा खून करतो. अशा अनेक घटना राज्यांमध्ये रोज घडत आहेत. हे काय चाललं आहे…? विद्यार्थिनी सोबत शिक्षकाचं लफडं कुटुंबात आई वडीलच एका कोपऱ्यात बसून मोबाईलवर रमलेले दिसतात. मुलगा एकीकडे मुलगी दुसरीकडे हे चित्र अतिशय वाईट आहे. नैतिक शिक्षण हे कुटुंबाकडून, शिक्षकाकडून, समाजाकडून मिळत असतं. यात सरकारची ही महत्त्वाची भूमिका असते पण याकडे सर्व स्तरातून दुर्लक्ष होत आहे. ही धोक्याची घंटा आहे आपण संतांचे विचार हरवलो आहोत की काय असा प्रश्न पडतो. यावर वेळीच जागृत होणं आवश्यक आहे आणि हा विचार नैतिक शिक्षण परिषदेच्या माध्यमातून राज्यात पहिल्यांदाच मांडला जात आहे ही आनंदाचे बाब आहे. एक परिषद घेऊन हा प्रश्न मिटणार नाही. या विचाराचं लोन महाराष्ट्रभर गेलं पाहिजे. यासाठी सर्व स्तरातून समाजाने पुढ येणं आवश्यक आहे.

          दुसऱ्या सत्रात नैतिक शिक्षण ही काळाची गरज या विषयावर परिसंवाद घेण्यात आला यात बालकल्याण समिती अध्यक्षा डॉ रानी खेडीकर, लोकवीकास मंचचे अध्यक्ष विश्वनाथ तोडकर, योगेश कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. या परिसंवादाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर या परिषदेत सात ठराव मांडले ते सर्वानूमते संमत करण्यात आले. १) नैतिक मूल्यांचा आदर्श विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावा यासाठी शिक्षकांनी कोणतेही व्यसन करू नये शाळेत किंवा शाळेच्या बाहेर व्यसन करताना आढळून आल्यास त्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी. २) विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी त्यांना पुरेशी झोप भेटणे आवश्यक आहे यासाठी सर्व शाळा या सकाळी नऊ वाजले नंतर सुरुवात कराव्यात. ३) शाळा महाविद्यालयाच्या पासून किमान एक किलोमीटरच्या आत कसलेही पान तंबाखू गुटखा सिगारेट मद्य आदी प्रकारची विक्री किंवा निर्मिती करणारे व्यवसाय बंद करावेत. ४) शाळेच्या अभ्यासक्रमात नैतिक मुल्यांचा स्वतंत्र तास सुरू करावा. ५) सर्व शाळांमध्ये चोरी, लबाडी, व्यसन, अन्याय, अत्याचार, व्याभिचार करणार नाही अशी २ मिनिटाची प्रतिज्ञा सुरू करावी. ६) शाळेच्या वेळेत शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मोबाईल बंदी करावी किंवा तो लॉकरमध्ये ठेवण्याची सक्ती करावी. ७) अशा प्रकारच्या नैतिक शिक्षण परीषदेचे आयोजन संपुर्ण राज्यात विभाग तालुका जिल्हा राज्य स्तरावर शाळांच्या सहकार्याने सुरू करण्यात यावे. हे ठराव राज्याचे शिक्षण खाते, मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना पाठवले जाणार आहेत.

      या परिषदेत वयाच्या २२ व्या वर्षी पहिल्या प्रयत्नात सी.ए. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या जयदीप चोपडे यांना युवा प्रेरणा, प्रथमेश देवकर यांना आदर्श शिक्षक, विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ प्यारामेडिकल सायन्स, कुंजीर पब्लिक स्कूल, स्पेक्ट्रम किड्स, यांना आदर्श शिक्षण संस्थेचा व साहित्य सम्राट संस्था यांना साहित्य साधना, अरूण दादा बेल्हेकर युवा राष्ट्रनीर्मान संस्थेला व्यसन मुक्ती, जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टला दिव्यांग सेवा, अर्चना शितोळे यांना यशस्वी महीला उद्योजक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक , शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवरांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या परिषदेचे आभार प्रदर्शन कृष्णा घुले तर सुत्र संचलन शैलेंद्र बेल्हेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजेंद्र कुंजीर, राजेश आरणे, बाळासाहेब विभुते, हेमंत टोलीवाल, गिरीश टोलीवाल, श्रद्धा कांबळे, सिध्दांत कांबळे सहयोगी संस्था सह्याद्री प्रतिष्ठान, जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्ट, अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनीर्मान संस्था इंदिरा शिक्षण संस्था, नीव फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

वेध जनशक्तीचा शक्ती जनतेची, वेध सत्याचा! सूचना, अस्वीकरण व संपादकीय धोरण “वेध जनशक्तीचा” हे पुणे येथून कार्यरत असलेले स्वतंत्र वेब न्यूज पोर्टल असून, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय, गुन्हेगारी तसेच विविध जनहिताच्या विषयांवरील बातम्या आणि माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे हा आमचा उद्देश आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, वृत्त, निवेदने, छायाचित्रे, व्हिडिओ किंवा अन्य सामग्री ही उपलब्ध कागदपत्रे, अधिकृत माहिती, प्रत्यक्षदर्शी, संबंधित व्यक्ती, प्रतिनिधी, वार्ताहर तसेच विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार प्रकाशित केली जाऊ शकते. बातमी प्रसिद्ध करण्याचा अधिकार जनहिताच्या दृष्टीने आवश्यक, महत्त्वाची किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित माहिती प्रसिद्ध करण्याचा संपादकीय निर्णयाचा अधिकार “वेध जनशक्तीचा” राखून ठेवते. कोणत्याही व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणा, व्यावसायिक संस्था अथवा इतर घटकाविषयी बातमी प्रसिद्ध झाल्याने त्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध पूर्वग्रह किंवा वैयक्तिक वैर असल्याचे समजले जाऊ नये. बातमीमध्ये एखाद्या व्यक्तीवर आरोप, तक्रार, गुन्हा, चौकशी, कारवाई किंवा अन्य गंभीर बाब नमूद असल्यास, उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारे ती बाब वाचकांसमोर मांडण्याचा पत्रकारितेचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आरोप प्रसिद्ध होणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरल्याचे मानले जाणार नाही. अंतिम सत्यता ठरविण्याचा अधिकार संबंधित सक्षम न्यायालय अथवा कायदेशीर प्राधिकरणास आहे. खोटी माहिती, दबाव व धमक्यांना थारा नाही “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाच्या दबावाखाली येऊन जनहिताच्या बातम्या मागे घेणे, बदलणे किंवा प्रसिद्ध न करणे यास बांधील राहणार नाही. तसेच, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर धमकी, दबाव, राजकीय हस्तक्षेप, वैयक्तिक आरोप, सोशल मीडिया दबाव किंवा अन्य कोणत्याही अनुचित मार्गाने संपादकीय निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न स्वीकारला जाणार नाही. मात्र, बातमीमध्ये वस्तुनिष्ठ तथ्यात्मक चूक असल्याचे विश्वसनीय पुराव्यांसह निदर्शनास आणून दिल्यास त्याची निष्पक्षपणे पडताळणी केली जाईल. दुरुस्ती, खुलासा व हरकत एखाद्या बातमीतील माहिती चुकीची, अपूर्ण किंवा वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचा दावा असल्यास संबंधित व्यक्ती अथवा संस्थेने केवळ तोंडी आक्षेप नोंदविण्याऐवजी— 👉संबंधित बातमीची लिंक, 👉चुकीची माहिती नेमकी कोणती आहे याचा स्पष्ट उल्लेख, 👉अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय पुरावे, 👉स्वतःची अधिकृत बाजू/खुलासा, 👉आवश्यक असल्यास संपर्काची माहिती आमच्याकडे उपलब्ध करून द्यावी. प्राप्त कागदपत्रे व माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आल्यास संबंधित बातमीमध्ये आवश्यक दुरुस्ती, स्पष्टीकरण, अद्ययावत माहिती किंवा अन्य योग्य संपादकीय कार्यवाही करण्यात येईल. केवळ बातमी आवडली नाही, प्रतिष्ठेला धक्का बसला, टीका झाली किंवा बातमी हटविण्याची मागणी करण्यात आली म्हणून बातमी आपोआप हटविली जाणार नाही. वार्ताहर व प्रतिनिधींबाबत महत्त्वाची सूचना “वेध जनशक्तीचा”शी संबंधित सर्व वार्ताहर, प्रतिनिधी व अन्य व्यक्तींनी आपल्या अधिकाराच्या मर्यादेतच काम करावे. कोणत्याही व्यक्तीकडून पैशांची मागणी, खंडणीसदृश व्यवहार, वैयक्तिक लाभाची मागणी, धमकी, दबाव, ब्लॅकमेलिंग किंवा पोर्टलच्या नावाचा गैरवापर झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची वैयक्तिक राहील. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध उपलब्ध कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. स्रोत व गोपनीयता पत्रकारितेच्या कामकाजात प्राप्त होणाऱ्या काही माहितीचे स्रोत गोपनीय ठेवण्याची आवश्यकता असू शकते. अशा वेळी कायदा व पत्रकारितेच्या मान्य तत्त्वांच्या अधीन राहून स्रोताची माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार संपादकीय विभाग राखून ठेवतो. तृतीय-पक्षाची सामग्री वाचकांच्या प्रतिक्रिया, निवेदने, जाहिराती, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, छायाचित्रे किंवा अन्य तृतीय-पक्षाची सामग्री प्रसिद्ध झाल्यास त्यातील प्रत्येक विधान हे पोर्टलचे अधिकृत मत असेलच असे नाही. अशा सामग्रीची जबाबदारी संबंधित सामग्री पुरविणाऱ्या व्यक्ती/संस्थेची राहू शकते. ⚠️ अंतिम महत्त्वाची नोंद “वेध जनशक्तीचा” हे सत्य, तथ्याधारित, जबाबदार आणि जनहिताची पत्रकारिता करण्यास कटिबद्ध आहे. अनावधानाने किंवा उपलब्ध माहितीच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या सामग्रीमध्ये तथ्यात्मक त्रुटी आढळल्यास योग्य पुराव्यांच्या आधारे त्याची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. मात्र, बातमीतील तथ्यात्मक चूक आणि बातमीमुळे निर्माण झालेली नाराजी या दोन वेगळ्या बाबी आहेत. तथ्यात्मक चूक सिद्ध झाल्यास दुरुस्ती केली जाईल; परंतु केवळ बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे निर्माण झालेला दबाव, नाराजी किंवा विरोध हा बातमी मागे घेण्याचा स्वयंचलित आधार मानला जाणार नाही. “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्तीची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने पत्रकारिता करत नाही; त्याचप्रमाणे जनहिताशी संबंधित सत्य, अधिकृत आणि पडताळणीयोग्य माहिती केवळ कोणाला अप्रिय वाटते म्हणून दडपण्याचेही धोरण नाही. सर्व कायदेशीर बाबींमध्ये लागू असलेले भारतीय कायदे व सक्षम न्यायालय/प्राधिकरणाचे आदेश अंतिम व बंधनकारक राहतील. न्यायक्षेत्र (Jurisdiction) या पोर्टलशी संबंधित कोणताही वाद, तक्रार किंवा कायदेशीर कार्यवाही उद्भवल्यास, लागू कायद्याच्या अधीन राहून बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथील सक्षम न्यायालयांना न्यायक्षेत्र राहील. संपर्क मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात 📞 7249314996 संपादक : श्री. धनंजय काळे 📞 9665221813 कार्यकारी संपादक : सहकार्यकारी संपादक : उपकार्यकारी संपादक : जिल्हा संपादक : जिल्हा उपसंपादक : विकास तिखे कायदेशीर सल्लागार : अँड. आनंद थोरात वेब पोर्टल : www.vedhjanshakticha.in “शक्ती जनतेची, वेध सत्याचा!” — वेध जनशक्तीचा संपादकीय विभाग बातमी अधिक ठाम आणि दबावाला उत्तर देणारी आहे, विशेषतः “बातमी आवडली नाही म्हणून हटविली जाणार नाही” आणि वार्ताहरांकडून पोर्टलच्या नावाचा गैरवापर केला जाणार नाही या बाबतीत. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??