जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

महापालिका निवडणुकीची संभाव्य तारीख जाहीर होणार ; १५ ते १७ डिसेंबरदरम्यान घोषणा अपेक्षित…

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाच्या मर्यादेवरून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे संपूर्ण निवडणूक कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेतील आरक्षणाच्या घोळामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या असताना, आता महापालिका निवडणुकीचा धुरळा सर्वप्रथम उडणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांचे संकेत आहेत.

आरक्षण मर्यादा न पाळल्यामुळे वेळापत्रक बदलणार…

राज्यातील ३२ पैकी तब्बल १७ जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला कडक शब्दांत बजावले की, मर्यादा ओलांडून निवडणुका घेता येणार नाहीत. परिणामी, १७ जिल्हा परिषदा मागे ठेवून उर्वरित १५ जिल्हा परिषदांची निवडणूक घेता येणार नसल्याने आयोगाने महापालिका निवडणुकीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूर आणि चंद्रपूर या दोनच महापालिकांमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडली असल्याने, राज्यातील इतर बहुतांश महापालिका डिसेंबरमध्येच मतदानाला जाऊ शकतात.

१५ ते १७ डिसेंबरदरम्यान होऊ शकते घोषणा…

राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी १० डिसेंबर रोजी वार्डनिहाय मतदार यादी अंतिम होणार आहे. आयोग त्याचा आढावा घेतल्यानंतर तीन ते चार दिवसांत निवडणुकीची अधिकृत घोषणा होणार आहे. आयोगातील वरिष्ठ सूत्रांच्या माहितीप्रमाणे:

➡️ महापालिका निवडणूक घोषणा – १५ ते १७ डिसेंबर दरम्यान
➡️ निवडणूक कालावधी – १५ डिसेंबर ते १० जानेवारी

सध्याच्या स्थितीत आयोगाकडे जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका घेण्यासाठी फक्त ५० ते ५२ दिवसांचा कालावधी उरला आहे.

कोणत्या निवडणुका कधी? अंदाजे वेळापत्रक…

👉🏻नगरपरिषद व नगर पंचायत निकाल – २१ डिसेंबर
👉🏻महापालिका निवडणुका – १५ डिसेंबर ते १० जानेवारी दरम्यान
👉🏻जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका – ५ ते ३१ जानेवारी

राज्यातील निवडणुकांचे वेळापत्रक बदलाच्या टप्प्यावर असताना, महापालिका निवडणुकांची घोषणा आता अगदी दारात आली आहे. पुढील काही दिवसांत राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??