जिल्हासामाजिक

आगामी काळात मतदार याद्यांमध्ये सुधारणा करून मतदार याद्या परिपूर्ण करणार जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी ; पुणे…

पुणे : जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील मतदार यादी मध्ये असलेली दुबार नावे, मयत झालेल्या व्यक्तींची नावे, कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे या संदर्भात माहिती घेऊन मतदार याद्यांमध्ये सुधारणा करून त्या परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने आगामी काळात प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात, मतदार याद्या तयार करण्याच्या अनुषंगाने मान्यता प्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्षांच्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत श्री डूडी बोलत होते. या बैठकीला उपजिल्हाधिकारी निवडणूक श्रीमती मीनल कळसकर, विविध राजकीय पक्षांचे जिल्हा प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डूडी पुढे म्हणाले, मतदार यादीत दोन ठिकाणी नाव असलेल्या मतदारांची नावे वगळण्यात येऊन एकाच मतदार यादीत नाव असेल याची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मार्फत खात्री केली जाईल. मतदार याद्यांमधील मयत मतदारांची नावे वगळण्यात येतील, यासाठी ग्रामपंचायत,नगरपरिषद, महानगरपालिका या कार्यालया कडुन मयत झालेल्या व्यक्तींच्या अभिलेख नोंदीच्या याद्या घेऊन त्याप्रमाणे मतदार यादी मध्ये मयत झालेल्या व्यक्तींची नांवे कमी करण्यात येतील. तसेच कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या मतदारांच्या बाबतही बीएलओ मार्फत सर्वेक्षण करण्यात येऊन याद्यांमध्ये सुधारणा करण्यात येईल. या कामांसाठी प्रशासनातर्फे बीएलओंना प्रशिक्षण देण्यात येईल मतदार यादीमध्ये चुकीच्या पद्धतीने नाव समावेश केले असेल तर प्रशासनातर्फे त्यात सुधारणा करण्यात येईल. या सर्व कामामध्ये पारदर्शकता ठेवली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहनही डूडी त्यांनी केले.

बैठकीत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी, मतदार यादी मध्ये सुधारणा करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना मांडल्यात. बैठकीच्या सुरुवातीला या संदर्भातील माहितीचे निवडणूक शाखेतर्फे सादरीकरण करण्यात आले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??