महाराष्ट्रसामाजिक

नवीन वर्षाची पहिली संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, वर्षभर पुण्य, सर्व इच्छा पूर्ण; सविस्तर पाहा, चंद्रोदय वेळा…

पुणे : २०२५ हे नवीन वर्ष सुरू झाले अनेकार्थांनी हे वर्ष विशेष आणि महत्त्वाचे मानले गेले आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच पौष महिन्यातील विनायक चतुर्थी अगदी उत्साहात साजरी करण्यात आल्यानंतर आता पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थी येत आहे.

         आपापल्या श्रद्धेनुसार भाविक संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. २०२५ ची पहिली पौष संकष्ट चतुर्थी कधी आहे? प्रमुख शहरांतील चंद्रोदय वेळ कोणती? या संकष्ट चतुर्थीचे महत्त्व काय आहे? जाणून घेऊया…

         गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आजही सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकतो. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे.

पौष संकष्ट चतुर्थी: शुक्रवार, १७ जानेवारी २०२५

पौष संकष्ट चतुर्थी प्रारंभ: शुक्रवार, १७ जानेवारी २०२५ रोजी पहाटे ०४ वाजून ०५ मिनिटे.

पौष संकष्ट चतुर्थी समाप्ती: शनिवार, १८ जानेवारी २०२५ रोजी पहाटे ०५ वाजून ३० मिनिटे.

         संकष्ट चतुर्थीचे व्रत एक काम्यव्रत आहे. हे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख-समृद्धी आणि बुद्धीप्रदान करतात, असे सांगितले जाते. धार्मिक पुराणांमध्ये गणपतीला बुद्धीचा देवता मानले गेले आहे. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

       संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे

         संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी. धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. उपवास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. अगदीच शक्य नसल्यास एकदातरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे.

विविध शहरांतील चंद्रोदय वेळ , शहरांची नावे चंद्रोदयाची वेळ.

मुंबई रात्रौ ०९ वाजून ३२ मिनिटे
ठाणे रात्रौ ०९ वाजून ३१ मिनिटे
पुणे रात्रौ ०८ वाजून २८ मिनिटे
रत्नागिरी रात्रौ ०९ वाजून ३१ मिनिटे
कोल्हापूर रात्रौ ०९ वाजून २८ मिनिटे
सातारा रात्रौ ०९ वाजून २८ मिनिटे
नाशिक रात्रौ ०९ वाजून २७ मिनिटे
अहिल्यानगर रात्रौ ०९ वाजून २४ मिनिटे
धुळे रात्रौ ०९ वाजून २२ मिनिटे
जळगाव रात्रौ ०९ वाजून १९ मिनिटे
वर्धा रात्रौ ०९ वाजून ०६ मिनिटे
यवतमाळ रात्रौ ०९ वाजून ०९ मिनिटे
बीड रात्रौ ०९ वाजून १९ मिनिटे
सांगली रात्रौ ०९ वाजून २६ मिनिटे
सावंतवाडी रात्रौ ०९ वाजून ३० मिनिटे
सोलापूर रात्रौ ०९ वाजून २० मिनिटे
नागपूर रात्रौ ०९ वाजून ०४ मिनिटे
अमरावती रात्रौ ०९ वाजून १० मिनिटे
अकोला रात्रौ ०९ वाजून १३ मिनिटे
छत्रपती संभाजीनगर रात्रौ ०९ वाजून २१ मिनिटे
भुसावळ रात्रौ ०९ वाजता १८ मिनिटे
परभणी रात्रौ ०९ वाजून १५ मिनिटे
नांदेड रात्रौ ०९ वाजून १२ मिनिटे
धाराशीव रात्रौ ०९ वाजून १९ मिनिटे
भंडारा रात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे
चंद्रपूर रात्रौ ०९ वाजून ०४ मिनिटे
बुलढाणा रात्रौ ०९ वाजून १७ मिनिटे
मालवण रात्रौ ०९ वाजून ३१ मिनिटे
पणजी रात्रौ ०९ वाजून ३० मिनिटे
बेळगाव रात्रौ ०९ वाजून २७ मिनिटे
इंदौर रात्रौ ०९ वाजून १६ मिनिटे
ग्वाल्हेर रात्रौ ०९ वाजून ०४ मिनिटे
|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया||

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??