जिल्हासामाजिक

बौद्ध वस्ती व मातंग वस्तीमध्ये तीव्र पाणीटंचाई, शासकीय जागेत बोअरवेल घेण्याची मागणी ; लोणी काळभोर…

लोणी काळभोर (ता. हवेली) : येथील बौद्ध वस्ती व मातंग वस्ती परिसरात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होत आहे. वाढती लोकसंख्या व वाढता पाण्याचा वापर यामुळे सध्याचा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर दि. 23 फेब्रुवारी 2025 रोजी ग्रामसेवक, लोणी काळभोर ग्रामपंचायत यांना निवेदन देत शासकीय जागेत सार्वजनिक बोअरवेल घेण्याची मागणी करण्यात आली.

अर्जदार दिगंबर अर्जुन जोगदंड यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, ते संबंधित परिसरात कायमस्वरूपी वास्तव्यास असून गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्याच्या काळात पाण्याची तीव्र कमतरता जाणवत आहे. सध्या ग्रामपंचायतीमार्फत दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अत्यंत अपुरा ठरत आहे. विशेषतः महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत असून दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे.

बौद्ध वस्ती व मातंग वस्तीतील नागरिकांनी यापूर्वीही ग्रामपंचायतीकडे बोअरवेलसाठी अनेक वेळा अर्ज सादर केले होते. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शासकीय योजनेंतर्गत सार्वजनिक ठिकाणी पाण्याची बोअरवेल मंजूर करून तातडीने काम हाती घ्यावे, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी विकास सेवा सोसायटीचे संचालक संजय भिमराव भालेराव, रिपब्लिकन भिमक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र जैनजागडे, शेतकरी नेते सुर्यकांत काळभोर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हवेली तालुका अल्पसंख्यांक उपाध्यक्ष नईम इनामदार उपस्थित होते. ग्रामसेवक गवारे यांनी निवेदन स्वीकारून विषयावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, पाणीटंचाईचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अन्यथा नागरिकांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. परिसरातील नागरिकांचे लक्ष आता ग्रामपंचायतीच्या निर्णयाकडे लागले आहे.

Edited sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??