सामाजिक

आधी पहा कायदा काय सांगतो ? शेतात घर बांधताय ? थांबा ! जाणून घ्या..

महाराष्ट्र : जास्त करुन शहरांमध्ये जमिनीच शिल्लक नाहीत. त्यामुळे गगनचुंबी इमारती उभारल्या जात असून त्यामध्ये भरमसाठ पैसे देऊन राहण्याची वेळ आली आहे . गावाकडे सुद्धा काही फारशी वेगळी परिस्थिती नाही. शहरात महागडी घरे घेण्यापेक्षा गावाकडे शेतात घर बांधून राहण्याकडे अनेकांचा कल आहे. पण जर शेतात घर बांधायचे असल्यास काही कायद्यांचे पालन करणे महत्वाचे असते. त्याचबद्दल जाणून घेऊयात…

जर तुम्हाला शेतात (agricultural land) घर बांधायचे असेल तर त्यासाठी शासनाची परवानगी नसते त्याआधी त्या जमिनीला तुम्हाला NA मध्ये रूपांतरित करावे लागेल. त्यानंतरच तुम्ही शेतीच्या जमिनीवर घर बांधू शकता आता ही जमीन NA करायची म्हणजे नक्की काय करायचं आणि त्यासाठी कोणती कागदपत्र महत्त्वाची असतात जाणून घेऊयात…

                       काय आहे शासनाचा GR ? (agricultural land)

सदर प्रक्रिये संदर्भात महाराष्ट्र शासनाकडून २०२३ मध्ये नवीन जीआर काढण्यात आला आहे. त्यानुसार बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टीम सुरू करण्यात आली आहे यानुसार बिगर कृषी वापर प्रमाणपत्र आणि बांधकाम तसेच विकास परवानगी जारी करण्याकरिता या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीचा (agricultural land) जर औद्योगिक वापर किंवा टाऊनशिप प्रोजेक्ट यासारख्या इतर कारणांकरिता वापर करायचा असेल तर नगर नियोजन योजनेच्या औद्योगिक क्षेत्रात अस्तित्वात असेल तर महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम १९६६ किंवा इतर कोणत्याही लागू असलेल्या कायद्याअंतर्गत यामध्ये काही महत्त्वाच्या अटीची पूर्तता करणे गरजेचे आहे.

यामध्ये ज्या व्यक्तीला शेतजमिनीचा एखाद्या गृहप्रकल्पाकरिता वापर करायचा असेल तर त्याच्याकडे त्या जमिनीचा ताबा असणं आवश्यक आहे आणि दुसरी महत्त्वाची अट म्हणजे जमीन किंवा त्या जमिनीचा कोणताही भाग एखाद्या सार्वजनिक हिताकरिता आवश्यक (agricultural land) प्रकल्पासाठी राखीव नसावा.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??