राजकीय

सरसंघचालक मोहन भागवत पुण्यातील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले घ्या जाणून..

पुणे : पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सहजीवन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. या सहजीवन व्याख्यानमाला कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थिती लावली.

          यावेळी त्यांनी भारत विश्वगुरु व्हायला हवं, असं मत मांडलं. यावेळी त्यांनी जगातील विविध घटनांचं उदाहरण दिलं. “भारत विश्वगुरु झाला पाहिजे, असं आपल्या सगळ्यांना वाटतं. कारण आपण सगळे भारतीय आहोत. विश्वाला गुरुची आवश्यकता आहे का? पूर्वीपेक्षा आजचे जग फार सुखी आहे. जगाचा संबंध एकमेकांशी वाढलाय. विचाराने जग पुढे जातेय. जो कोणी आतापर्यंतचा जागाचा गुरु आहे त्याच्या मार्गदर्शनात सगळं ठीक चाललं आहे. सुख-सुविधा वाढल्या आहेत. पण मनुष्याजवळ सुख आहे का?”, असा सवाल मोहन भागवत यांनी केला.

        “सोयीसुविधा वाढली, पण शांती नाही. कोणीही गोळीबार करतं, घटस्फोटाचे प्रमाण वाढले. युद्ध थांबत नाहीत. कुठे ना कुठे युद्ध सुरु आहे. कट्टरपणा कमी होत नाही. पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. जमीन प्रदूषित झालीय. पाहिजे तेव्हा पाऊस येत नाही. येतो तेव्हा सगळं घेऊन जातो. हे आजच्या परिस्थितीचे वर्णन आहे.

           “जगात सगळे सुखी होऊ शकत नाही. जगात ४ टक्के लोक जगातील ८० टक्के संसाधन वापरतात. जगात हा नियम आहे. सगळ्यांचं चांगले होणार नाही. बलवान असतील त्यांच फक्त चांगलं होणार. जगात अस्तित्वासाठी संघर्ष सुरु आहे. मानव जात एकच आहे, असं म्हणायची चाल आहे”, असंही त्यांनी म्हटलं.

           ‘या जगात एक राक्षशी प्रवृत्ती…’

“खायला बकरीचे मास पाहिजे, तर बकरी पाळली पाहिजे. सायन्सच्या आधारवर सर्व सुरु आहे. ते देखील बदलत असतं. सायन्सचा फायदा ज्यांचा हाती साधनसंपत्ती होती त्यांनी घेतला. आज अशी स्तिथी आहे, एक बाजू उजळ आहे, मानव म्हणून गौरवशाली आहे. पण दुसरी बाजू पृथ्वीचा विनाश करणारी आहे. त्यामुळे लोक चिंतेत आहेत. या जगात एक राक्षशी प्रवृत्ती आहे तिला वाटत आम्ही म्हणू तस झालं पाहिजे. दुसरी प्रवृत्ती दैवी प्रवृत्ती आहे ती म्हणते आम्हाला जगू द्या, तुम्हीही जगा. जगाला गुरुची आवश्यकता आहे आणि तो भारत होऊ शकतो”, असं सरसंघचालकांनी सांगितले.

          “आपल्याला महासत्ता व्हायचं नाही. कारण महासत्ता झाल्यावर काय करतात लोक ते आपल्याला माहीत आहे. श्रीलंका भरतासोबत कशी वागली ते आपल्याला माहीत आहे. पण श्रीलंकेला पहिली मदत नेहमी भारताने केली. विश्वगुरु भारत झाला पाहिजे तर आपण काय करावं? या देशाची भक्ती आम्ही का करावी? असा प्रश्न तरुणांना पडत असेल”, असं मोहन भागवत म्हणाले.

            ‘आपलं राष्ट्र सनातनी राष्ट्र’

“भारत विश्वगुरु झाला तर ठेकेदारी बंद होईल. आमचं राष्ट्र परोपकारासाठी तयार झालंय. इतरांच्या देवी दैवतांचे हाटाळणी करू नये. आम्ही सगळ्यांबरोबर मिळून मिसळून जगभरात राहतोय. राम मंदिर झालं पाहिजे असं हिंदूना वाटत होतं. पण असं झालं म्हणजे नेता होता येतं, असं नाही. आपला देश आता संविधानाने चालतो. जे निवडून येतील ते राज्य चालवतील. इंग्रजांच्या कारस्थानामुळे पाकिस्तान निर्माण झालं. ज्याची त्याची पूजा ज्याला त्याला लक लाभो. पण नियम पाळले गेले पाहिजे. आपलं राष्ट्र इंग्रजांनी तयार केलेले नाही. आपलं राष्ट्र सनातनी राष्ट्र आहे”, असंही मोहन भागवत यावेळी म्हणाले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??