जिल्हादेश विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

“अजितदादांचा वारसा सुनेत्रा वहिनींकडेच जावा” – नरहरी झीरवाळ यांचे स्पष्ट विधान…

बारामती (पुणे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आता कोण सांभाळणार, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. बुधवारी (29 जानेवारी) बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, सामान्य नागरिकांपासून राजकीय नेत्यांपर्यंत सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, अंत्यसंस्कारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नरहरी झीरवाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पक्षाच्या नेतृत्वाबाबत महत्त्वाचे विधान केले. “अजित पवार यांचा उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनीच पुढे यावे, ही पक्षातील कार्यकर्त्यांची आणि जनतेची भावना आहे,” असे झीरवाळ यांनी स्पष्टपणे सांगितले. ते पुढे म्हणाले, “आता तुतारी आणि घड्याळ वेगळे राहिलेले नाहीत. दोन्ही राष्ट्रवादी आधीच एकत्र आलेल्या आहेत आणि यापुढेही त्या एकत्रच राहतील, याबाबत कोणतीही शंका नाही.”

झीरवाळ यांनी बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची भावना व्यक्त करताना सांगितले की, “सर्वसामान्य जनतेकडून सुनेत्रा वहिनींना नेतृत्वाच्या भूमिकेत पाहण्याची इच्छा आहे. नगरपरिषद निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले होते. काही ठिकाणी मतभेद दिसले असले, तरी आता एकत्र येण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही.”

अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या भवितव्यावर निर्माण झालेली धूसरता या विधानामुळे काही प्रमाणात दूर होण्याची शक्यता असून, पक्षाचे नेतृत्व सुनेत्रा पवारांकडे सोपवले जाईल, अशी ही पहिली अधिकृत माहिती मानली जात आहे. यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय वाटचालीला नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??