जिल्हाराजकीयसामाजिक

उमेदवारी नाकारली, वरिष्ठांचे फोन बंद; निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या संयमाचा बांध फुटण्याच्या मार्गावर…

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने राजकीय पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांच्या नाराजीचा स्फोट होऊ लागला आहे. पक्षाने उमेदवारी नाकारताच अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला असून, त्याहून अधिक वेदनादायी बाब म्हणजे उमेदवारी द्यायची नसल्याने वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी थेट फोन उचलणेच बंद केल्याचे सुत्रामार्फत माहिती मिळत आहे. 

पक्षासाठी एकनिष्ठेने तब्बल एक तप काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शेवटच्या क्षणी अंधारात ठेवण्यात आले. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत काही तासांवर येऊन ठेपलेली असतानाही पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी संपर्काबाहेर राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. “पक्षासाठी दिवस-रात्र झटून काम करायचे, रस्त्यावर उतरून प्रचार करायचा, प्रत्येक आंदोलनात पुढे राहायचे आणि शेवटी आयाराम-गयारामांना सहज उमेदवारी मिळायची असेल, तर निष्ठेचे मोल तरी काय?” असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.

आम्ही रक्ताचे पाणी करून पक्षाचे काम केले. मात्र बाहेरून आलेल्या लोकांना किंवा ऐनवेळी पक्षात प्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी कशी काय दिली जाते?” असा संतप्त सवाल इच्छुक उमेदवार आणि निष्ठावंत कार्यकर्ते आपापसात व्यक्त करत आहेत. पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करूनही डावलले गेल्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनात खोलवर रुजली आहे.

निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून उमेदवारी कशाच्या आधारे दिली गेली, हा आजही न सुटणारा प्रश्न आहे. “माझा निष्ठावान कार्यकर्ता” असे म्हणत केवळ दिवस ढकलले गेले की काय, असा प्रश्न उपस्थित होत असून वरिष्ठांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलणे हे पक्षासाठी दीर्घकालीन नुकसानकारक ठरणार का, याचा निर्णय येणारा काळच देईल, यात शंका नाही. मात्र, या नाराजीचे परिणाम मतदानाच्या माध्यमातून जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आता कार्यकर्त्यांकडून दिला जात आहे.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उफाळून आलेला हा असंतोष पक्षासाठी धोक्याची घंटा मानली जात असून, निष्ठा विरुद्ध आयत्यावेळी आलेली उमेदवारी हा संघर्ष अधिक तीव्र होत चालल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??