जिल्हाशिक्षणसामाजिक

समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी…

तुळशीराम घुसाळकर

लोणी काळभोर (ता. हवेली) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात बालिका दिनाचे औचित्य साधून प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा सखोल आढावा घेत त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. स्नेहा बुरगुल यांनी सांगितले की, अवघ्या ९ व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचा ज्योतिराव फुलें सोबत विवाह झाला. विवाहानंतर ज्योतिरावांनी त्यांना शिक्षणाची वाट दाखवली आणि त्यातूनच सावित्रीबाई देशातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या. शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवून आणत त्यांनी बालविवाहास विरोध, विधवा विवाहाला प्रोत्साहन आणि अनाथ मुलांसाठी आश्रम सुरू करून समाजसुधारणेचे मोलाचे कार्य केले. १८९७ साली पुण्यात प्लेगची साथ असताना रुग्णांची सेवा करत असताना त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, हे त्यांचे समाजप्रती असलेले अपार समर्पण दर्शवते, असे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी डॉ. बुलबुल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत सावित्रीबाई फुले यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरी केली जाते, हे सांगत त्यांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने झाली. हे पूजन प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर म्हणाले की, ज्या काळात स्त्रियांनी शिक्षण घेणे पाप मानले जात होते, त्या काळात अंगावर शेण व दगड झेलत सावित्रीबाई फुले यांनी ज्ञानाची गंगा घराघरात पोहोचवली. शाळेत जाताना त्यांच्यावर होणाऱ्या अपमानाला न डगमगता त्यांनी आपल्या झोळीत दुसरी साडी ठेवून अध्यापनाचे कार्य अखंड सुरू ठेवले.
एक मुलगा शिकला तर एक व्यक्ती शिकते, पण एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते,” हा विचार प्रत्यक्षात आणण्याचे काम सावित्रीबाईंनी केले. आज स्त्रिया ग्रामपंचायत सरपंच पदापासून ते राष्ट्रपती, पंतप्रधान पदापर्यंत विविध क्षेत्रांत प्रगती करत आहेत, याचे श्रेय सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला जाते, असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. डॉ. शिवाजी गायकवाड यांनी केले.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??