राजकीय

विद्यार्थी संघटनांच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन ; चार आमदारांना मंत्रीपद देऊ नका यासाठी आंदोलन…

पुणे : राज्यात महायुतीच सरकार येऊन जवळपास वीस दिवसाचा कालावधी उलटून गेला. तरी मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नाही. या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पदाची शपथ घेऊन राज्याचा कारभार चालवत आहेत.
या महायुती सरकारमधील कोणत्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस, भीम आर्मी स्टुडन्ट फेडरेशन आणि पुरोगामी विद्यार्थी संघटनाकडून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले.
महायुती सरकारमधील शिंदे गटाचे आमदार संजय राठोड, आमदार अब्दुल सत्तार, आमदार तानाजी सावंत आणि भाजपचे आमदार नितेश राणे या चार आमदारांना मंत्रीपदे देवू नका, या मागणीसाठी विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले.
तसेच या चार नेत्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. यावेळी अक्षय कांबळे म्हणाले की, मागील सरकारमध्ये शैक्षणिक विभागात अब्दुल सत्तार यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप, तर आरोग्य विभागामध्ये तानाजी सावंत यांनी देखील भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. तसेच एका तरुणीच्या मृत्यू प्रकरणी मागील काळात संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच समाजात तेढ निर्माण करणारी विधाने भाजपचे आमदार नितेश राणे हे सातत्याने करित आले आहेत.
यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या चार आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, अन्यथा भविष्यात विद्यार्थी संघटना मोठ्या प्रमाणावर आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??