जिल्हाराजकीयसामाजिक

नुकसान भरपाईसाठी कदमवाकवस्तीतील संताप, १३ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा ; राजेश्री उदय काळभोर…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिक व शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने कदमवाकवस्ती परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्या राजेश्री उदय काळभोर यांनी जिल्हाधिकारी, पुणे यांना निवेदन देत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच १३ एप्रिल २०२६ पासून अप्पर तहसील कार्यालय, लोणी काळभोर समोर बेमुदत आमरण उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे.

निवेदनानुसार, १४ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कदमवाकवस्तीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरून अन्नधान्य, कपडे, फर्निचर व इतर जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक कुटुंबांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. या घटनेनंतर ग्रामपंचायतीकडून तत्काळ पंचनामे करून ते ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले होते.

मात्र, त्यानंतरच्या प्रशासकीय प्रक्रियेत मोठ्या त्रुटी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंतिम नुकसानग्रस्तांच्या यादीत अनेक पात्र नागरिकांची नावे वगळण्यात आली, तर काही पंचनामे जाणूनबुजून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवलेच गेले नाहीत, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. परिणामी, प्रत्यक्ष नुकसान सहन करूनही अनेक नागरिक व शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित आहेत.

याबाबत संबंधित ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सर्व पात्र लाभार्थ्यांची पुनर्तपासणी करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी ठाम भूमिका ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली आहे.

दरम्यान, प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास १३ एप्रिलपासून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याने परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे. या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढणार असून स्थानिक नागरिकांचे लक्ष या प्रश्नाकडे लागले आहे.

या निवेदनाच्या प्रती राजेश्री उदय काळभोर यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार लोणी काळभोर तसेच पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे यांना देण्यात आल्या असून आता प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??