जिल्हामहाराष्ट्रशिक्षणसामाजिक

मोठी बातमी! २०२६-२७ पासून दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन ; ‘एआय’च्या मदतीने होणार तपासणी..

पुणे : राज्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षांच्या उत्तरपत्रिका आता पारंपरिक पद्धतीऐवजी ऑनलाइन तपासल्या जाणार आहेत. चुकीच्या उत्तराला गुण देणे, अर्धवट उत्तराला पूर्ण गुण देणे, अक्षरातील अदलाबदल अशा त्रुटी टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)ची मदत घेतली जाणार आहे. हा नवा पॅटर्न २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून राबविण्याचा प्रस्ताव असून तो शासनाच्या अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

राज्यात सुमारे १५ हजार केंद्रांवर दहावी-बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. सध्या परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका संकलित करून ठरावीक शाळांमध्ये जमा केल्या जातात. त्यानंतर त्या विषय शिक्षकांकडे तपासणीसाठी पाठवल्या जातात. तपासणी झालेल्या उत्तरपत्रिका मॉडरेटर व चीफ मॉडरेटरकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया असते. या प्रक्रियेत वेळ, श्रम व खर्च वाढतो तसेच गैरप्रकाराला वाव मिळण्याची शक्यता असते.

अशी असणार नवी पद्धत…

नव्या प्रणालीअंतर्गत परीक्षा संपल्यानंतर त्याच केंद्रावर उत्तरपत्रिकांचे तात्काळ ऑनलाइन स्कॅनिंग केले जाईल. स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका बोर्डाच्या प्रणालीवर अपलोड होतील. विषयानुसार शिक्षकांची माहिती संकलित करून संबंधित शिक्षकांच्या लॉगिनवर त्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी उपलब्ध होतील.

शिक्षकांना घरी, शाळेत किंवा अन्य ठिकाणाहून मोबाईल, टॅब किंवा संगणकाच्या माध्यमातून तपासणी करता येणार आहे. एआय प्रणाली चुकीच्या उत्तराला गुण देणे, अर्धवट उत्तराला जादा गुण देणे यांसारख्या बाबी ओळखून तपासणी अधिक अचूक करण्यास मदत करणार आहे.

आधी कुठे राबवला पॅटर्न?

Madhya Pradesh राज्यात हा पॅटर्न प्रथम राबविण्यात आला. त्यानंतर Central Board of Secondary Education (सीबीएसई) नेही दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी ऑनलाइन तपासणी व एआयचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. आता Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education देखील पुढील शैक्षणिक वर्षापासून ही पद्धत अमलात आणण्याच्या तयारीत आहे.

शासन स्तरावर अंतिम निर्णय…

“मध्यप्रदेश आणि सीबीएसईच्या धर्तीवर स्टेट बोर्डातही ऑनलाइन तपासणीचा विचार सुरू आहे. अंतिम निर्णय शासन स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतला जाईल,” अशी माहिती विभागीय अध्यक्ष औदुंबर उकिरडे यांनी दिली.

या निर्णयामुळे उत्तरपत्रिका तपासणीतील पारदर्शकता वाढण्यासोबतच वेळ, खर्च आणि मनुष्यबळाची मोठी बचत होणार असल्याचे बोर्ड अधिकाऱ्यांचे मत आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??