कृषी व्यापार

साडेपाच लाख शेतकऱ्यांना ५३५ कोटींची भरपाई! गेली दोन वर्षांपासून भरपाई प्रलंबित.. शेतकऱ्यांना दिलासा..

महाराष्ट्र : नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱयांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने अखेर मदत देण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील ५ लाख ३० हजार ४५ शेतकऱयांना ५३५ कोटी ६५ लाख ७४ हजार ८९४ रुपयांची मदत वितरित करण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी आज दिली. गेल्या दोन वर्षांपासून ही भरपाई प्रलंबित होती.

राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे शेतकऱयांचे प्रचंड नुकसान झाले होते. पण निवडणूक आचारसंहिता व सरकार स्थापना, मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप यामुळे शेतकऱयांना मदत मिळत नव्हती. त्यामुळे शेतकऱयांमध्ये रोष निर्माण झाला होता. अखेर राज्य सरकारने शेतकऱयांना मदत जाहीर केली आहे.

विविध नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेती पीक नुकसानीपोटी मार्च २०२३ पासून ९ हजामार्च कोटी रुपये इतकी रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱयांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्यात आली आहे.

नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यातील 4 हजार 274 शेतकऱयांना 5 कोटी 65 लाख 55 हजार 735 रुपये, नाशिक जिल्ह्यातील 5 हजार 42 शेतकऱ्यांना 4 कोटी 43 लाख 98 हजार 642 रुपये, अहिल्यानगर जिल्ह्यातील 2 हजार 975 शेतकऱ्यांना 2 कोटी 54 लाख 65 हजार 970 रुपये, धुळे जिल्ह्यातील 483 शेतकऱयांना 46 लाख 83 हजार 551 रुपये, नंदुरबार जिल्ह्यातील 17 शेतकऱ्यांना 2 लाख 78 हजार 465 रुपये.

पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यातील 43 हजार 321 शेतकऱयांना 35 कोटी 87 लाख 16 हजार 94 रुपये, सोलापूर जिल्ह्यातील 3 हजार 13 शेतकऱयांना 4 कोटी 25 लाख 4 हजार 287 रुपये, सांगली जिल्ह्यातील 522 शेतकऱयांना 52 लाख 12 हजार 803 रुपये, पुणे जिल्ह्यातील 390 शेतकऱयांना 32 लाख 74 हजार 489 रुपये आणि सातारा जिल्ह्यातील 27 शेतकऱयांना 1 लाख 14 हजार 376 रुपये मदतीचा यामध्ये समावेश आहे.

    मकरंद जाधव-पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री.. 

राज्य शासनाने विविध नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी 5 लाख 30 हजार शेतकऱयांना 535 कोटी रुपयांची भरपाई वितरित केली आहे. ही रक्कम संबंधित शेतकऱयांच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येत आहे.

कोकण विभागात पालघर जिल्ह्यातील 1 हजार 742 शेतकऱयांना 1 कोटी 22 हजार 999 रुपये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 920 शेतकऱयांना 23 लाख 47 हजार 667 रुपये, ठाणे जिल्ह्यातील 127 शेतकऱयांना 12 लाख 48 हजार 990 रुपये, रायगड जिल्ह्यातील 161 शेतकऱयांना 10 लाख 67 हजार 86 रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील 71 शेतकऱयांना 1 लाख 72 हजार 516 रुपये मदत जाहीर झाली आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??