जिल्हाशिक्षणसामाजिक

शालेय बस नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या 249 वाहनांवर कारवाई ; 22 लाखांहून अधिक दंड वसूल…

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठी तपासणी मोहीम राबवली असून, 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत 1,464 वाहनांची तपासणी करण्यात आली. यापैकी 249 वाहनांमध्ये शालेय बस नियमावलीतील विविध उल्लंघने आढळून आली असून त्यांच्यावर कारवाई करत 22 लाख 22 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असल्याने, जिल्हा शालेय बस सुरक्षितता समितीचे अध्यक्ष तथा पुणे पोलीस आयुक्त यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांनुसार शाळा व वाहनधारकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. विशेषत: शालेय बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, 6 वर्षांखालील मुलांसाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती, तसेच वाहनचालक, वाहक व मदतनीस यांची पोलीस चारित्र्य पडताळणी करणे बंधनकारक आहे.

शासन निर्णय संकिर्ण 1125/प्र.क्र. 241/25/एसएम-1, दि. 16 एप्रिल 2025 नुसार सर्व शाळांनी शालेय परिवहन समिती आणि विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती स्थापन करणे आवश्यक आहे. या समित्यांनी दरवर्षी वाहनचालकांची नेत्र तपासणी झाल्याचे प्रमाणपत्र तपासणे आणि प्रमाणपत्र नसलेल्या चालकांना शालेय वाहतूक देऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

याशिवाय, विद्यार्थ्यांवरील अनुचित प्रकार रोखण्यासाठी 23 ऑगस्ट 2024 च्या शासन निर्णयानुसार गठित उच्चस्तरीय समितीने वाहतुकीसंबंधी महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. त्यानुसार, प्रत्येक शालेय बसमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य, मुलींच्या शाळांसाठी वाहनांमध्ये महिला कर्मचारी बंधनकारक, तसेच सर्व कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी अनिवार्य आहे.

प्रादेशिक परिवहन विभागपोलीस विभाग संयुक्तपणे विशेष तपासणी मोहीम राबविणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. शैक्षणिक सहलीदरम्यानही शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी आणि बसची सर्व वैध कागदपत्रे सोबत ठेवावीत, असे आवाहन RTOने केले आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??