क्राईम न्युजजिल्हाशिक्षणसामाजिक

महाराष्ट्र बोर्ड पेपर लीकच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक ; शिवाजीनगर पोलिसांकडून १८ वर्षीय तरुणाचा पर्दाफाश…

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (महाराष्ट्र बोर्ड) परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक असल्याचा बनाव करून विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चैतन्य विनोद शेंडे (वय १८) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने टेलिग्रामद्वारे केलेल्या फसवणुकीची पद्धत उघड केली.

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील तांत्रिक सुविधेचा गैरवापर करून विद्यार्थ्यांना पेपर लीक झाल्याचा भास निर्माण करत होता. टेलिग्रामवर एकदा पीडीएफ फाईल अपलोड केल्यानंतर ती नंतर बदलता येते. फाईल बदलली तरी मूळ अपलोडची वेळ (टाईमस्टॅम्प) तशीच राहते आणि फक्त “Edited” अशी नोंद दिसते. याच सुविधेचा वापर करून आरोपीने फसवणूक केली.

चौकशीत आरोपीने सांगितले की, तो परीक्षेच्या एक दिवस आधी टेलिग्रामवर पासवर्ड-प्रोटेक्टेड पीडीएफ फाईल अपलोड करत असे. त्यानंतर संबंधित टेलिग्राम ग्रुपमध्ये “माझ्याकडे परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे” असा दावा करून ती फक्त ६०० रुपयांत देण्याची ऑफर देत असे. काही विद्यार्थ्यांनी पैसे पाठवल्यानंतर आरोपी त्यांना तात्काळ ब्लॉक करत असे.

दरम्यान, परीक्षा संपल्यानंतर तो प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका मिळवून आधी अपलोड केलेल्या पासवर्ड असलेल्या पीडीएफच्या जागी ती फाईल बदलत असे. त्यामुळे त्या फाईलवर जुनाच वेळ दिसत राहिल्याने पाहणाऱ्यांना प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच अपलोड केली होती असा भास निर्माण होत असे.

पोलीसांच्या मते, टेलिग्रामवरील “फाईल रिप्लेस” सुविधेचा वापर करून आरोपीने खोटी कालमर्यादा तयार केली आणि विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा विश्वास बसवून त्यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??