महाराष्ट्रसामाजिक

ऑक्टोबरच्या एकाच महिन्यात १ लाख वेळा वीज गुल; महाराष्ट्रात वारंवार बिघाड.. पहा सविस्तर आकडेवारी..

महावितरणने जाहीर केलेल्या 'रिलायबिलिटी इंडेक्स'मधून ही संतापजनक आकडेवारी..

पुणे : वाढत्या वीजबिलांनी मेटाकुटीस आलेल्या सामान्य नागरिकांना वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यानेही जेरीस आणले आहे. केवळ एका महिन्याच्या कालावधीतच तब्बल एक लाख ७ हजार ८८ वेळा वीज गुल झाली.

महावितरणने जाहीर केलेल्या ‘रिलायबिलिटी इंडेक्स’मधून ही संतापजनक आकडेवारी पुढे आली आहे.

वीज नियामक आयोगाच्या नियमानुसार महावितरणला प्रत्येक महिन्यातील ही आकडेवारी ऑनलाइन जाहीर करावी लागते. यात कोणत्या परिमंडळात किती फिडरवर किती वेळा तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे किती तास वीज पुरवठा खंडित झाला, याची माहिती दिली जाते. परंतु, हा रिलायबिलिटी इंडेक्स किंवा विश्‍वासार्हता निर्देशांक जाहीर करण्याबाबत अनेकदा महावितरणच्या यंत्रणेकडून काणाडोळा केला जातो.

त्यामुळे पुण्यातील सजग नागरिक मंचाने थेट वीज नियामक आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर महावितरणने ३ जानेवारी रोजी तीन महिन्यांचे इंडेक्स जाहीर केले. त्यात ऑक्टोबर या एकाच महिन्यात ६ हजार ३१७ फिडरवर एक लाखापेक्षा अधिक वेळा तांत्रिक बिघाड झाला.त्यामुळे राज्यातील ग्राहकांना तब्बल ५३६ कोटी ५५ लाख ९२ हजार ४५४ मिनिटे म्हणजेच ६७ हजार ८१५ तास विजेविना घालवावे लागले.

      खेड्यापाड्यांना यापेक्षाही अधिक त्रास.. 

रिलायबिलिटी इंडेक्सनुसार महिनाभरात एक लाख वेळा तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित झाला. मात्र ग्रामीण भागात यासोबतच भारनियमनाचाही त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय देखभाल दुरुस्तीच्या नावानेही काही वेळा वीज पुरवठा बंद ठेवला जातो.

कोणत्या परिसरात किती वेळा तांत्रिक बिघाड ! झोन बिघाडांची संख्या सविस्तर पहा… 

अकोला ५४५७

अमरावती १३,३७९

चंद्रपूर १८६६

गोंदिया ९७८

नागपूर ८१९

बारामती १५,९१३

भांडूप (उ) १०,९००

छत्रपती संभाजीनगर २१०७

जळगाव ४२३१

कल्याण १०,६६४

रत्नागिरी ५५५५

कोल्हापूर १३,०५४

लातूर २०७

नांदेड १७९१

नाशिक ३९९९

पुणे १६,१६८

एकूण १,०७,०८८

महावितरणच्या इंडेक्सवर वीज नियामक आयोगाने नजर ठेवावी. एका महिन्यात इतका तांत्रिक बिघाड होत असेल तर आयोगाने महावितरणला स्पष्टीकरण का मागू नये? जबाबदारी का निश्‍चित करू नये?

विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??