जिल्हा

हवेलीतील मुख्याध्यापकाचा काशीद समुद्रकिनारी बुडून मृत्यू ; सहल जीवावर बेतली ; जाणून घ्या सविस्तर..

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पिसोली येथील महात्मा ज्योतिराव हायस्कूलचे मुख्याध्यापकाचा मृत्यू..

मुरुड (जंजिरा) : काशीद येथील समुद्रकिनारी पुण्यातील शाळेच्या मुख्याध्यापकांचा बुडून मृत्यू होण्याची घटना शुक्रवारी घडली. धर्मेंद्र देशमुख (वय ५६) असे त्यांचे नाव आहे. सध्या मुरुड व काशीद समुद्र समुद्र किनारी नाताळ सुट्टी असल्याने पर्यटकांनी खूप मोठी गर्दी केली आहे.

      पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पिसोली येथील महात्मा ज्योतिराव हायस्कूल येथील शाळेचा ११ जणांचा समूह काशीद समुद्र किनारी फिरण्यास आला होता. यामध्ये शिक्षकांसह मुख्याध्यापक सुद्धा आले होते. बहुसंख्य लोक काशीद समुद्र किनारी पोहण्यासाठी उतरले. पोहता पोहता या शाळेचे मुख्याध्यापक धर्मेंद्र देशमुख (वय ५६) हे खोलवर पाण्यात खेचले गेले. ते बराच वेळ पाण्याखाली राहिले. शेवटी किनार्‍यावरील जीवरक्षकांनी त्यांना पाण्याबाहेर काढून बोर्ली आरोग्य केंद्रात नेले. तेथून अधिक उपचारांसाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण तेथे उपचारापूर्वीच ते मरण पावले. या घटनेची नोंद मुरुड पोलिसात करण्यात आली आहे.

        दरम्यान, सध्या नाताळच्या सुट्टीमुळे मुरुड तालुक्यात पर्यटकांची संख्या वाढली आहे. समुद्रकिनारेही फुलून गेलेले आहेत. भरतीच्यावेळी अनेक पर्यटक हे पाण्यात आनंद लुटत आहेत. पण अनेकदा पाण्याचा अंदाज न आल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. काशीद ग्रामपंचायतीने पर्यटकांच्या सुचनेसाठी येथे सुचना फलक लावलेले आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत असल्याने अशा दुर्घटना घडत आहे. नागरिकांनी सुचनेचे पालन करावयाचे असे प्रशासनाद्वारे सुचना देण्यात आल्या आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??