जिल्हासामाजिक

रेडी रेकनरच्या ५ पटीने मोबदला आधी द्या, तरच जमीनीचा ताबा घ्या, बैठकीत ठरल ; पीएमआरडीए व भूसंपादनाच्या अधिकाऱ्यांनी सूचनांची नोंद करून घेतली…

विकासासाठी कदमवाकवस्ती येथील शेतकरी यांचा शासनाला विरोध नाही, पण आधी मोबदला ; कदमवाकवस्ती येथील नागरिक व शेतकरी यांचा आक्रमक पवित्रा...

पुणे (हवेली) : पुणे सोलापूर रोडवर वसलेले पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती मोठ्या संख्येने लोकवस्ती व व्यवसायात प्रगतीपथावर असलेले गाव  म्हणून प्रचलित.. 

कदमवाकवस्ती येथील नागरिक शासनाच्या भूसंपादनाच्या मनमानी कारभारा विरोधात कदमवाकवस्ती येथे एकवटली असता या बैठकीत विकासासाठी आमचा कोणाचाही शासनाला विरोध नाही. रिंगरोड करण्यासाठी लागेल, तेवढ्या आमच्या जमिनी घ्या. पण मोबदला मात्र दोन अडीच पटीने नव्हे, तर रेडी रेकनरच्या पाच पटीने मिळाला पाहिजे, असे स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाकडे यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी भूमिका घेतली.

प्रारुप विकास योजनेतील ६५ मीटर रुंद रस्त्यासाठी सन २०१५ च्या नवीन भूसंपादन अधिनियमाव्दारे खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी करावयाच्या जमीनीच्या भूसंपादन या प्रस्तावासंदर्भात कदमवाकवस्ती येथील ग्रामपंचायतीच्या मैदानात प्रशासन व शेतकरी यांच्यामध्ये प्राथमिक बैठक दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पार पडली.

यावेळी पुणे भूसंपादन उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, भूसंपादन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अव्वल कारकून विद्या गायकवाड, सुरेखा काकडे, एकनाथ ढाके, मंडलाधिकारी योगिता गायकवाड, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणचे कार्यकारी अभियंता अरविंद माळी, वरिष्ठ अभियंता अमित हस्ते, तहसीलदार आशा होळकर, पुणे जिल्हा भूमी अभिलेखचे निरीक्षक जयसिंग गाडे, लिपिक रोहित चोपडे, भूकरमापक स्नेहा भिसे, मंडलाधिकारी लक्ष्मण बांडे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पुणे रिंग रोड हा ६५ मीटरचा असून बावडी, लोहगाव, वाघोली, मांजरी खुर्द, कदमवाकवस्ती येथील रिव्हर व्ह्यू सिटीच्या जवळून पिराच्या मंदिरापासून फुरसुंगी व पुढे वडकीच्या दिशेने जाणार आहे. या रिंगरोडमध्ये कदमवाकवस्ती येथील शेकडो शेतकऱ्यांची अंदाजे जवळपास १६ ते १७ एकर जमीन (67581.54 चौ. मी.) या रस्त्यामध्ये जाणार आहे.

पुणे भूसंपादन उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे पुढे म्हणाले की…

वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी रिंग रोड तयार करण्यात येत आहे. यामध्ये कदमवाकवस्ती येथील अनेक शेतकऱ्यांचे क्षेत्र जात आहे. त्याचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लोकहित व विकासासाठी क्षेत्र देऊन सहकार्य करावे. तसेच या क्षेत्राच्या बदल्यात शेतकऱ्यांना शासनाकडून रेडी रेकनरच्या अडीच पटीने मोबदला देण्यात येणार आहे, असेही पांढरे यांनी सांगितले.

            स्थानिक शेतकरी व नागरिक आक्रमक…

पुणे भूसंपादन उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांच्या या प्रतिउत्तराला अनेक शेतकरी नाराजी दाखवत शेतकरी आक्रमक झाले.

              शेतकरी गणपत चावट पुढे म्हणाले…

यावेळी बोलताना शेतकरी गणपत चावट म्हणाले की, क्षेत्र देण्यासाठी आमची काहीही अडचण नाही. पण रेडी रेकनरच्या अडीच पट मोबदला आम्हास मान्य नाही. जर शासनाने रेडी रेकनरच्या ५ पटीने मोबदला दिला, तरच आम्ही आमच्या जमिनी देऊ. अन्यथा आम्ही जमिनी देणार नाहीत. तसेच रिंगरोडचे सर्कल रद्द केले तर व्यावसायिकांची दुकाने व शेतकऱ्यांची घरे वाचतील.

  शेतकरी यांचा शासनाच्या प्रतिनिधी याना प्रश्न…

दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांनी पुणे-सोलापूर रस्त्याच्या रुंदीकरण, रिंग रोड, शिवरस्ता याबाबतच्या तक्रारी अधिकाऱ्यांन पुढे मांडल्या, काही शेतकऱ्यांचे क्षेत्र रिंग रोडमध्ये गेले असून त्यांचे या यादीत नावे नाहीत. मग त्यां शेतकरी यांना मोबदला मिळणार का? अशी भुमिका मांडल्यावर पीएमआरडीए व भूसंपादनाच्या अधिकाऱ्यांनी सूचनांची नोंद करून घेतली.

        कदमवाकवस्ती येथील गावकरी एकवटले…

यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी सभापती अनिल टिळेकर, उद्योजक बाळासाहेब भोसले, गणपत चावट, चित्तरंजन गायकवाड, कदमवाकवस्तीचे उपसरपंच नासिर पठाण, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत सदस्य आकाश काळभोर, माजी उपसरपंच ऋषिकेश काळभोर, उदय काळभोर, सुशील काळभोर, तुषार काळभोर, कदमवाकवस्ती ग्रामसेवक अमोल घोळवे, शेतकरी व व्यवसायीक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??