महाराष्ट्रराजकीय

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील…

बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा! बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु...

प्रतिनिधी डॉ गजानन टिंगरे

पुणे (इंदापूर) : (दि.११) प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह दिव्यांग विधवा महिलांच्या प्रश्नांसंदर्भात तसेच सर्वसामान्य नागरिक, महिला, शेतमजूर, युवक यांच्या हितासाठी केलेल्या विविध मागण्यांना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे. या संदर्भात बच्चू कडू यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि.११) सायंकाळी दूरध्वनीवरून चर्चा केली व पाठिंबा व्यक्त करीत त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली.

बच्चू कडू यांनी मोझरी-अमरावती येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळाजवळ विविध मागण्यासाठी बेमुदत अन्न त्याग आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाचा बुधवार हा ४ था दिवस आहे.

बच्चू कडू यांचेची दूरध्वनीवरून चर्चा करून हर्षवर्धन पाटील यांनी बच्चू कडू यांच्या विविध मागण्यांवरती राज्य सरकारने गांभीर्याने विचार करून त्या तात्काळ मान्य कराव्यात, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू, असे सत्ताधारी पक्षांने निवडणुकीच्या संकल्पपत्रात जाहीर केलेले आहे. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा केला जाणार होता. परंतु निवडणुका संपल्यानंतर सत्ता स्थापन होऊन अनेक महिने होऊनही सरकारकडून या आश्‍वासनांची पूर्तता केली जात नाही. सध्या शेतकरी अडचणीत असून उत्पादन खर्च वाढला असून शेतीमालाला चांगला भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी, ही बच्चू कडू यांची रास्त मागणी असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. तसेच बच्चू कडू यांनी समाजातील इतर घटकांच्या हितासाठी केलेल्या विविध मागण्याही राज्य सरकारने मान्य कराव्यात, अशी मागणीही हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??