महाराष्ट्रसामाजिक

सरकारी कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी दीड वर्षात पूर्ण करण्याचा आदेश…

संपादक सुनिल थोरात

मुंबई : कर्तव्य बजावताना निष्काळजीपणा करणे, गैरवर्तन करणे, नियम व कायद्याचे उल्लंघन करणे अशा प्रकरणांमध्ये सरकारी कर्मचाऱयांची विभागीय चौकशी करून कारवाई केली जाते. मात्र वरिष्ठ अधिकारी प्रकरण दाबण्याच्या उद्देशाने ती चौकशी वेळेत पूर्ण करत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे विभागीय चौकशीला आता काळाचे बंधन घातले गेले आहे. १८ महिन्यांत विभागीय चौकशी पूर्ण न करणाऱया अधिकाऱयांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला. सरकारी कर्मचाऱयांवर आरोप असेल तर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 नुसार त्यांची विभागीय चौकशी केली जाते. अशी चौकशी करण्याचा निर्णय झाल्यानंतर ती 18 महिन्यांत पूर्ण केली जावी, असे या निर्णयात म्हटले आहे. तसेच चौकशीचे टप्पे आणि कालावधीही निश्चित करण्यात आला आहे.

चौकशीतील एखाद्या टप्प्यावर निश्चित कालावधीपेक्षा जास्त वेळ लागला तर चौकशी रद्द करणे किंवा स्थगित करण्याचा अधिकार आरोपी कर्मचाऱयाला नसेल. अपवादात्मक परिस्थितीत चौकशीसाठी वाजवी कारण देऊन मुदतवाढ मागता येणार आहे.

चौकशी प्रकरणांचा नियमित आढावा घेण्याचे निर्देश…

सरकारी कर्मचाऱयांविरुद्ध प्रलंबित असलेल्या विभागीय चौकशी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी त्यांचा नियमित आढावा घेण्याचे निर्देशही शासनाने कार्यालय प्रमुख, विभागप्रमुख, प्रशासकीय अधिकारी यांना दिले आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??