राजकीय

शासनाने कितीही प्रयत्न केले तरी प्रकल्प पूर्ण होवू देणार नाही ; पुरंदर शेतकरी..

पुणे : पुरंदर तालुक्यातील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पूर्णपणे कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प करण्याचा शासनाने चंग बांधला आहे. त्यादृय्ष्टीने तालुक्यातील गायरान शासनाच्या जमिनीची माहिती संकलित करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर पर्यंत भूमी अधिग्रहण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे एकीकडे शासन प्रकल्प पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतानाच ज्या परिसरात प्रकल्प उभारला जाणार आहे, त्या भागातील शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. शासनाने कितीही प्रयत्न केले तरी प्रकल्प पूर्ण होवू देणार नाही असा निर्धार शेतकर्‍यांनी केला असून याचाच भाग म्हणून गुरुवारी (दि. २३) प्रकल्प अंतर्गत गावातील शेतकरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. शासनाच्या विरोधात शेतकर्‍यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला असून प्रकल्प बाधित जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विमानतळ प्रकल्प अंतर्गत येणार्‍या वनपुरी, उदाचीवादी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव येथील शेतकर्‍यांनी या प्रकल्पास सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे. यासाठी शेतकर्‍यांनी वेळोवेळी मोर्चे, निवेदने देवून शासनाला आपला विरोध दर्शविला आहे.

पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, आमदार विजय शिवतारे यांच्या घरावर अंत्ययात्रा, तहसील कार्यालय येथे मोर्चा काढून शासनाचा वेळोवेळी निषेध केला आहे. प्रकल्प जाहीर झाल्यापासून सर्व मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना शेतकर्‍यांनी भूमिका सांगितली आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??