महाराष्ट्रराजकीयसामाजिक

“नो पीयूसी – नो फ्युएल” : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा आदेश – पेट्रोल पंपांवर वैध PUC नसल्यास वाहनांना मिळणार नाही पेट्रोल-डिझेल…

मुंबई : महाराष्ट्रातील वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रदूषण रोखण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता वैध PUC (प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र) नसेल तर कोणत्याही वाहनाला पेट्रोल किंवा डिझेल मिळणार नाही. “नो पीयूसी – नो फ्युएल” हा उपक्रम लवकरच संपूर्ण राज्यात सक्तीने लागू केला जाणार आहे.

पेट्रोल पंपांवर कडक अंमलबजावणी…

प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत सांगितले की, प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने इंधन भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांचा क्रमांक स्कॅन केला जाईल. यामुळे वाहनाचे PUC वैध आहे की नाही हे लगेच कळेल. जर वाहनाचे PUC वैध नसेल तर त्याला इंधन दिले जाणार नाही.

तथापि, वाहनचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्या पंपावरच त्वरित PUC काढून घेण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या PUC ला एक युनिक आयडेंटी (UID) असणार असून त्याची वैधता वेळोवेळी तपासली जाऊ शकते.

पर्यावरण रक्षणासाठी कठोर पावले…

मंत्री सरनाईक म्हणाले,

> “भविष्यातील पिढीला प्रदूषणमुक्त वातावरण देण्यासाठी आजच्या पिढीने काही निर्बंध पाळले पाहिजेत. वैध PUC हे प्रत्येक वाहनासाठी बंधनकारक आहे. अवैध पद्धतीने PUC प्रमाणपत्र काढणाऱ्यांविरोधात मोठी धडक मोहीम राबवली जाईल.”

यासोबतच, वाहन विक्री करणाऱ्या शोरूम आणि वाहन दुरुस्ती गॅरेजमध्येही PUC देण्याची सोय केली जाणार आहे. यामुळे रस्त्यावर चालणारे प्रत्येक वाहन प्रदूषण नियंत्रण नियमांचे पालन करणारे असेल.

अवैध प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कारवाई…

सध्या राज्यात अनेक ठिकाणी बनावट किंवा अवैध पद्धतीने PUC देणाऱ्या टोळ्यांचा उच्छाद आहे. त्यावर आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम राबवावी, असे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी दिले.

बैठकीतील इतर महत्त्वाचे निर्णय…

या बैठकीत परिवहन भवन बांधकाम, परिवहन विभागाच्या कार्यालयात आगीची पूर्वसूचना देणारी यंत्रणा बसविणे आदी महत्त्वाच्या बाबींचा देखील आढावा घेण्यात आला.

वाहनचालकांमध्ये खळबळ…

सरकारच्या या निर्णयामुळे वाहनचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र पर्यावरण रक्षणासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

Editer Sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??