जिल्हादेश विदेशराजकीयसामाजिक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज…

नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करून जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ मागितली आहे. या अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

मागील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला चार आठवड्यांत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. तसेच हे शक्य नसेल, तर वेळ वाढवून घेण्यासाठी पुन्हा कोर्टाकडे यावे, असेही स्पष्ट केले होते. त्यानुसार आयोगाने निवडणुकीच्या तयारीस सुरुवात केली होती. अनेक महापालिकांची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून जिल्हा परिषदपंचायत समित्यांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.

तथापि, प्रभाग रचना आणि आरक्षण या मुद्द्यांवर मुंबई व नागपूर खंडपीठात याचिका दाखल झाल्या आहेत. यामुळेच आयोगाने मुदतवाढीची मागणी केल्याचे समजते.

सुप्रीम कोर्टाने जर आयोगाचा अर्ज मान्य केला, तर त्यावर तातडीने निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, अर्ज फेटाळला गेला, तर कोर्टाच्या पूर्वीच्या आदेशानुसार चार आठवड्यांच्या आत निवडणुका जाहीर कराव्या लागतील.

याचिकाकर्त्यांचे वकील देवदत्त पालोदकर यांनी सांगितले की, “या अर्जामुळे निवडणुका तातडीने जाहीर होणार नाहीत. आयोगाने जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ मागितली आहे. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जातील, असे स्पष्ट दिसते.”

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??