जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

ICICI बँकेचा मोठा निर्णय ; बचत खात्यात किमान बॅलेन्सची मर्यादा 5 पट वाढवली…

मुंबई : जर तुमचं खाते आयसीआयसीआय बँकेत असेल तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. बँकेने बचत खात्यातील किमान बॅलेन्स (Minimum Account Balance – MAB) मर्यादेत मोठी वाढ केली आहे. ही रक्कम आधीच्या तुलनेत तब्बल 5 पट वाढवून मेट्रो व शहरी भागातील ग्राहकांसाठी 50 हजार रुपये करण्यात आली आहे. हा नियम 1 ऑगस्ट 2025 पासून लागू झाला आहे.

पूर्वी ही मर्यादा फक्त 10 हजार रुपये होती. आता मेट्रो व शहरी भागात 50 हजार, निमशहरी भागात 25 हजार आणि ग्रामीण भागात 10 हजार रुपये किमान बॅलेन्स ठेवणं अनिवार्य आहे. नियमांचे पालन न केल्यास ग्राहकांना दंड भरावा लागेल.

या निर्णयामुळे आयसीआयसीआय बँक देशांतर्गत बँकांमध्ये सर्वाधिक मिनिमम अकाऊंट बॅलेन्स असणारी बँक ठरली आहे. त्याच्या तुलनेत, सार्वजनिक क्षेत्रातील एसबीआयने 2020 मध्येच किमान बॅलेन्सची अट रद्द केली होती. इतर खासगी बँकांपैकी एचडीएफसी बँकेत मेट्रो भागात 10 हजार, निमशहरीत 5 हजार आणि ग्रामीण शाखांमध्ये 2,500 रुपये किमान बॅलेन्स ठेवावा लागतो.

एप्रिल 2025 मध्ये आयसीआयसीआय बँकेने बचत खात्यांवरील व्याजदरात 0.25% कपात केली होती. आता बचत खात्यावर 2.75% व्याज, तर 50 लाखांपेक्षा जास्त रकमेवर 3.25% व्याज मिळेल. हा व्याजदर बदल 16 एप्रिलपासून लागू आहे.

बँकेने ग्राहकांना खाते शिल्लक तपासण्याचे व नवीन नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??