जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

जिल्हा परिषदांचे 12 निकाल जाहीर ; भाजप नंबर वन, अजित पवारांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानी…

महायुतीचे वर्चस्व कायम ; महाविकास आघाडीला ग्रामीण महाराष्ट्रात धक्का...

मुंबई : (2026) राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी पार पडलेल्या निवडणुकांचा निकाल काल जाहीर झाला असून, या निकालात सत्ताधारी महायुतीने दणदणीत विजय मिळवत ग्रामीण महाराष्ट्रावर आपली पकड अधिक मजबूत केली आहे. सर्वच्या सर्व 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीने सत्ता मिळवली असून, भाजप हा पक्ष पुन्हा एकदा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे.

12 पैकी 8 जिल्हा परिषदांमध्ये भाजप, 3 जिल्हा परिषदांमध्ये शिंदे गटाची शिवसेना, तर पुणे जिल्हा परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. नगरपालिकांपासून ते महानगरपालिका, आणि आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांपर्यंत भाजपने विजयाची हॅटट्रिक साधली आहे.

आकडेवारीतून स्पष्ट होणारे चित्र… 
राज्यातील जिल्हा परिषद – 731 जागा पंचायत समिती – 1462 जागा

या निवडणुकांमध्ये —
भाजप: 233 जागा
राष्ट्रवादी (अजित पवार गट): 167 जागा
शिंदे गट शिवसेना: 162 जागा
महायुतीने मिळून 731 पैकी तब्बल 562 जागांवर विजय मिळवला आहे. एकिकडे,

काँग्रेस: 56
राष्ट्रवादी (शरद पवार गट): 26
शिवसेना (ठाकरे गट): 43
अशी महाविकास आघाडी अवघ्या 125 जागांवरच समाधान मानावे लागले, त्यामुळे ग्रामीण भागात एमव्हीएला मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे.

कुठे-कुणाची सत्ता? 12 जिल्हा परिषदांचे निकाल पुढील प्रमाणे…

रायगड जिल्हा परिषद (59 जागा)
शिवसेना (शिंदे) – 21
राष्ट्रवादी – 16
भाजप – 15
शिवसेना (UBT) – 5
काँग्रेस – 2

रत्नागिरी जिल्हा परिषद (56 जागा)
शिंदे शिवसेना – 40
भाजप – 4
राष्ट्रवादी (अजित पवार) – 5
ठाकरे गट – 6
मनसे – 1

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद (50 जागा)
भाजप – 27
शिंदे सेना – 14
ठाकरे गट – 3
अपक्ष – 6

पुणे जिल्हा परिषद (73 जागा)
राष्ट्रवादी (अजित पवार) – 51
भाजप – 10
शिवसेना – 5
ठाकरे गट – 6
शरद पवार गट – 1
पुण्यात अजित पवार गटाची एकहाती सत्ता

सातारा जिल्हा परिषद (65 जागा)
भाजप – 27
राष्ट्रवादी – 20
शिवसेना – 15
काँग्रेस – 1
इतर – 2

सांगली जिल्हा परिषद (61 जागा)
राष्ट्रवादी (शरद पवार) – 18
भाजप – 16
काँग्रेस – 11
शिंदे सेना – 7
राष्ट्रवादी (अजित पवार) – 6
इतर/स्थानिक पक्ष – 3

कोल्हापूर जिल्हा परिषद (68 जागा)
राष्ट्रवादी – 20
काँग्रेस – 14
भाजप – 12
शिंदे शिवसेना – 9
स्थानिक व आघाडी – उर्वरित

सोलापूर जिल्हा परिषद (68 जागा)
भाजप – 38
राष्ट्रवादी (अजित पवार) – 11
शिंदे सेना – 8
इतर – 11

छत्रपती संभाजीनगर (63 जागा)
भाजप – 23
शिवसेना (शिंदे) – 21
ठाकरे गट – 9
अपक्ष – 4
इतर – 6

परभणी जिल्हा परिषद (54 जागा)
भाजप – 24
राष्ट्रवादी – 15
ठाकरे गट – 6
शिवसेना – 5
काँग्रेस – 3

धाराशिव जिल्हा परिषद (55 जागा)
भाजप – 19
शिंदे सेना – 15
ठाकरे गट – 7
राष्ट्रवादी – 6
काँग्रेस व इतर – उर्वरित

लातूर जिल्हा परिषद (59 जागा)
काँग्रेस – 23
भाजप – 18
राष्ट्रवादी (अजित पवार) – 11
इतर – 7

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालातून महायुतीचा ग्रामीण महाराष्ट्रातील दबदबा स्पष्टपणे दिसून आला आहे. भाजपने सर्वाधिक जागा जिंकत राज्यातील ग्रामीण राजकारणात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर महाविकास आघाडीला मात्र संघटनात्मक पातळीवर आत्मपरीक्षणाची गरज असल्याचे या निकालांवरून स्पष्ट होते.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??