आरोग्यजिल्हासामाजिक

स्वातंत्र्यदिनीच नागरिकांची बेफिकीरी ; फोरव्हीलरमधून रस्त्यावर कचरा टाकल्याने संताप…

पुणे (हवेली) : काल देशभरात स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना, आपल्या परिसरात स्वच्छतेबाबत गंभीर निष्काळजीपणा समोर आला. एका सुशिक्षित दिसणाऱ्या व्यक्तीने फोरव्हीलर गाडीतून कचरा थेट रस्त्यावर फेकल्याचा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार पाहून स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, “आपण स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत असताना नागरिक म्हणून आपली मूलभूत जबाबदारी विसरलो आहोत का?” असा सवाल निर्माण झाला आहे.

१५ दिवसांपासून सुरू आहे जनजागृती…

कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या गावातील नवपरीवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड, दिपक काळभोर आणि सामाजिक संघटनांनी गेल्या १५ दिवसांपासून नागरिकांना आवाहन केले आहे. “सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका, आपल्या घरी येणाऱ्या कचरा वेचकांना तो द्या. जर कचरा वेचक येत नसतील, तर थेट आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तुमची समस्या सोडवू.” तरीदेखील काही नागरिक निर्लज्जपणे खुलेआम कचरा टाकत आहेत, ही खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

हेतू अपमानाचा नाही, शिस्तीचा…

स्थानिक स्वच्छता मोहिमेच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले की, कोणाचाही अपमान किंवा मन दुखावणे हा त्यांचा हेतू नाही. गाव स्वच्छ ठेवणे, नागरिकांना शिस्त लावणे आणि ‘स्वच्छ भारत मिशन’ला हातभार लावणे हेच उद्दिष्ट आहे.

नागरिकांसाठी आवाहन…

“कचरा फेकणे हा केवळ नियमभंग नसून, तो आपल्या गावाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारा प्रकार आहे. स्वच्छता ही सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे, आणि त्यासाठी प्रत्येकाने जागरूक होण्याची गरज आहे,” असे आवाहन नवपरीवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते दिपक काळभोर यांनी व स्वच्छता मोहिमेच्या स्वयंसेवकांनी केले.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??