जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

थेऊर ग्रामपंचायत फेर आरक्षण सोडतीवर मोठा वाद; १७ जुलैची नोटीस, सभा नाही… १८ जुलैची प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात…

थेऊर, (पुणे : हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी झालेल्या वॉर्ड फेरआरक्षण प्रक्रियेवरून मोठा वाद निर्माण झाला असून, संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर ग्रामस्थांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. १७ जुलैच्या विशेष ग्रामसभेची नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाली; मात्र प्रत्यक्षात त्या दिवशी ग्रामसभा झालीच नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यानंतर अवघ्या एका दिवसाच्या नोटिशीवर १८ जुलै रोजी फेरआरक्षण प्रक्रिया पार पडल्याने संपूर्ण कार्यवाहीवर आक्षेप घेतले जात आहेत.

माहितीनुसार, १२ जून २०२६ रोजी झालेल्या आरक्षण सोडतीनंतर वॉर्ड क्रमांक ४ च्या आरक्षणावर हरकत दाखल करण्यात आली होती. त्यानंतर प्रांताधिकारी स्तरावर सुनावणी होऊन अपर तहसीलदारांनी फेरआरक्षणाबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला. राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार १० जुलैपर्यंत अंतिम आरक्षण जाहीर होणे अपेक्षित असतानाही थेऊर ग्रामपंचायतीची अंतिम आरक्षण यादी प्रसिद्ध झाली नव्हती.
दरम्यान, १६ जुलै रोजी सायंकाळी अपर तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या स्वाक्षरीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. या पत्रानुसार १७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता विशेष ग्रामसभा घेऊन फेरआरक्षण सोडत होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. ग्रामसभेच्या अध्यक्षपदी लोणी काळभोर मंडलाधिकारी लक्ष्मण बांडे यांची नियुक्ती असल्याचाही उल्लेख होता.

मात्र, मंडलाधिकारी लक्ष्मण बांडे यांनी आपल्याला या ग्रामसभेबाबत कोणताही लेखी अथवा तोंडी आदेश मिळाला नसल्याचे सांगितल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे १७ जुलै रोजी सकाळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात जमा झाले. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाने अशा कोणत्याही ग्रामसभेची माहिती किंवा अधिकृत पत्र प्राप्त झाले नसल्याचे सांगितल्याने त्या दिवशी ग्रामसभा झालीच नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठा संभ्रम आणि संताप निर्माण झाला.

यानंतर १७ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस फलकावर १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता विशेष ग्रामसभा होणार असल्याची नवीन सूचना लावण्यात आली. रात्री आठ वाजता दवंडी देण्यात आली आणि त्यानुसार १८ जुलै रोजी मंडलाधिकारी लक्ष्मण बांडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेऊन फेरआरक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

मात्र, या प्रक्रियेदरम्यान नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. परिस्थिती तणावपूर्ण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनेक ग्रामस्थांनी तात्काळ हरकती नोंदवून त्या ग्रामसभेच्या इतिवृत्तात समाविष्ट करण्याची मागणी केली. तसेच संपूर्ण फेरआरक्षण प्रक्रियेला न्यायालयीन व प्रशासकीय स्तरावर आव्हान देण्याचा इशाराही दिला.

ग्रामस्थांनी आणखी गंभीर आरोप करत, प्रत्यक्ष ग्रामसभेत आरक्षणाची सोडत काढण्यात आलीच नाही, तर वॉर्डनिहाय आरक्षणाची संपूर्ण यादी किंवा ‘स्क्रिप्ट’ आधीच तयार करून आणण्यात आली होती आणि सभागृहात केवळ तिचे वाचन करण्यात आल्याचा दावा केला. कोणतीही सविस्तर चर्चा, हरकतींवरील विचार किंवा प्रत्यक्ष सोडत न करता केवळ औपचारिकता पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यावेळी अनेक ग्रामस्थांनी उभे राहून प्रक्रियेचा निषेध नोंदविला.

ग्रामसभा घेण्याच्या कायदेशीर प्रक्रियेवरही ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. नियमानुसार ग्रामसभेची सूचना किमान तीन दिवस आधी देणे आवश्यक असताना, केवळ एक दिवस आधी सायंकाळी नोटीस लावून दुसऱ्याच दिवशी ग्रामसभा घेण्यात आल्याने संपूर्ण प्रक्रिया नियमबाह्य असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही ग्रामस्थांनी, “तासाभराच्या गोंधळात नेमके काय झाले हेच समजले नाही,” अशी प्रतिक्रिया दिली.

याबाबत निवडणूक अधिकारी तथा ग्रामसभेचे अध्यक्ष लक्ष्मण बांडे यांच्याकडे प्रतिक्रिया मागितली असता, “या प्रकरणातील माझे संपूर्ण म्हणणे ग्रामसभेच्या प्रोसिडिंग रजिस्टरमध्ये नोंदविलेले आहे,” एवढीच प्रतिक्रिया देत त्यांनी माध्यमांसमोर अधिक बोलण्यास नकार दिला.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची विभागीय आयुक्तांकडे तक्रार करून फेरआरक्षण प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे थेऊर ग्रामपंचायतीतील फेरआरक्षणाचा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??