जिल्हामहाराष्ट्रशिक्षणसामाजिक

शालेय बस सुरक्षेसाठी नवे नियम लागू ; ३ महिन्यांत अंमलबजावणी बंधनकारक, सीसीटीव्ही-जीपीएस-सीटबेल्ट अनिवार्य…

पुणे, दि. २७ : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देत महाराष्ट्र शासनाने शालेय बस व विद्यार्थी वाहतूक वाहनांसाठी सुधारित नियम लागू केले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या १६ जुलै २०२६ रोजीच्या राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र मोटार वाहन (शालेय बस नियमन) (प्रथम सुधारणा) नियम, २०२६ लागू करण्यात आले असून, या नियमांची अंमलबजावणी पुढील तीन महिन्यांच्या आत करणे बंधनकारक राहणार आहे.

सुधारित नियमानुसार, मुंबई महानगर क्षेत्र वगळता राज्यातील इतर भागात शालेय बस व शालेय व्हॅनच्या परवान्यासाठी वाहनाचे आयुष्यमान १५ वर्षांवरून २० वर्षांपर्यंत वाढविण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालक व संस्थांना काहीसा दिलासा मिळणार असला, तरी सुरक्षेच्या बाबतीत अधिक कठोर अटी लागू करण्यात आल्या आहेत.

याशिवाय, शालेय बसच्या शुल्क (दर) निर्धारणाचे अधिकार संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे (RTA) सोपविण्यात आले आहेत.
सर्व शालेय बस आणि विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस (VLTD) पॅनिक बटणासह, फायर डिटेक्शन अँड अलार्म सिस्टिम, सीसीटीव्ही कॅमेरे, डिजिटल सेफ्टी मॉनिटरिंग सिस्टिम, वाहनाचे थेट लोकेशन दाखविणारे मोबाईल अॅप, विद्यार्थ्यांच्या डिजिटल उपस्थितीची नोंद, पालकांना सूचना देणारी यंत्रणा तसेच किमान ३० दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज जतन करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

तसेच, वाहनातील प्रत्येक आसनाला सीटबेल्ट असणे बंधनकारक करण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ही महत्त्वाची तरतूद मानली जात आहे.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शालेय वाहतुकीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढणार असून, पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवासावर थेट लक्ष ठेवता येणार आहे. तसेच शालेय बस व्यवस्थेत अधिक पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सुरक्षितता सुनिश्चित होण्यास मदत होणार आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??