माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती ; १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन…

पुणे, दि. २७ : पुणे जिल्ह्यातील माजी सैनिक तसेच माजी सैनिकांच्या विधवांच्या पाल्यांसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत कल्याणकारी निधी अंतर्गत शिष्यवृत्ती योजना २०२६-२७ राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी १५ सप्टेंबर २०२६ पूर्वी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
या योजनेनुसार, सन २०२५-२६ मध्ये इयत्ता दहावी, बारावी किंवा पदवी परीक्षा ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षण घेत असलेल्या माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे उपलब्ध असून, संबंधित माजी सैनिक किंवा माजी सैनिकांच्या विधवांनी आपल्या पाल्यांचे अर्ज आवश्यक कागदपत्रांसह १५ सप्टेंबर २०२६ पूर्वी कार्यालयात जमा करावेत.
याबाबतची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर एस. फिरासत (नि.) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली असून, पात्र लाभार्थ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Editer sunil thorat



